'ऐका दाजीबा' फेम अभिनेत्री आठवतेय का?, आता दिसते अशी!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 07:00 AM2021-09-09T07:00:00+5:302021-09-09T07:00:00+5:30

२००२ साली गायक वैशाली सामंत हिच्या स्वरसाजात सजलेले ऐका दाजिबा हे गाणे रिलीज झाले होते आणि हे गाणे खूप लोकप्रिय झाले होते.

Do you remember 'Aika Dajiba' fame actress?, Now looking like this | 'ऐका दाजीबा' फेम अभिनेत्री आठवतेय का?, आता दिसते अशी!

'ऐका दाजीबा' फेम अभिनेत्री आठवतेय का?, आता दिसते अशी!

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीतील गायक वैशाली सामंत हिच्या स्वरसाजात सजलेले ऐका दाजिबा हे गाणे २००२ साली रिलीज झाले. हे गाणे खूप लोकप्रिय झाले होते. आजही हे गाणे बऱ्याचदा आपल्याला ऐकायला मिळते.आजही सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये या गाण्यावर परफॉर्मन्स पहायला मिळतो. या गाण्यात मिलिंद गुणाजी आणि इशिता अरुण ही जोडी पहायला मिळली होती. मिलिंद गुणाजी सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहेत. पण इशिता सिनेइंडस्ट्रीतून गायब आहे.

१९८२ साली वयाच्या तिसऱ्या वर्षी व्हीक्स कफ ड्रॉप्सच्या जाहिरातीत इशिताने काम केले होते. शाळेत शिकत असतानाच इशिताने नादिरा बब्बर यांच्या अभिनय वर्कशॉपमधून अभिनयाचे धडे गिरवले होते.

सेंट झेविअर्स कॉलेजमधून तिने आपले शिक्षण पूर्ण केले. श्याम बेनेगल यांच्या यात्रा मालिकेत तिला अभिनय करण्याची संधी मिळाली होती.


इशिता ही सुप्रसिद्ध अभिनेत्री,गायिका इला अरुण यांची लेक आहे. गायक सोनू निगमच्या मौसम या अल्बममध्ये ती झळकली होती. एका म्युझिकल शोचे तिने सूत्रसंचालन केले आहे.

इशिता अरूणने २००५ साली ध्रुव घाणेकरसोबत लग्न केले. ध्रुव घाणेकर हा बॉलिवूडचा गायक आहे. ध्रुव घाणेकर हा दिग्दर्शक गिरीश घाणेकर यांचा मुलगा आहे.

गिरीश घाणेकर यांनी वाजवा रे वाजवा, रंगत संगत, नवसाचं पोर सारखे अनेक चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. त्यांच्या गोट्या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता.

Web Title: Do you remember 'Aika Dajiba' fame actress?, Now looking like this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.