'चौकट राजा' चित्रपटातील ही चिमुरडी आठवतेय का?, आता तिला ओळखणंही झालंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 07:00 AM2021-06-18T07:00:00+5:302021-06-18T07:00:00+5:30

'चौकट राजा' या चित्रपटात राणीची भूमिका साकारणारी बालकलाकर सध्या या क्षेत्रात आहे कार्यरत, जाणून घ्या तिच्याबद्दल

Do you remember this Chimurdi from the movie 'Chaukat Raja'? Now it is difficult to recognize her | 'चौकट राजा' चित्रपटातील ही चिमुरडी आठवतेय का?, आता तिला ओळखणंही झालंय कठीण

'चौकट राजा' चित्रपटातील ही चिमुरडी आठवतेय का?, आता तिला ओळखणंही झालंय कठीण

googlenewsNext

१९९१ साली चौकट राजा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा चित्रपट रिलीज होऊन ३० वर्षे उलटली आहेत. तरीदेखील आजही हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून कायम आहे. या चित्रपटातील सर्वच पात्र प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत. संजय सुरकर दिग्दर्शित आणि स्मिता तळवळकर निर्मित चौकट राजा चित्रपटातून दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेल्या नंदूच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती. त्यावेळी महाराष्ट्र सरकारतर्फे पुरस्कारही देण्यात आले होते. या चित्रपटात स्मिता तळवळकर, दिलीप कुलकर्णी, सुलभा देशपांडे, अशोक सराफ हे कलाकार मुख्य भूमिकेत होते तर बालकलाकार राजसी बेहरे हिने देखील आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटविली होती.

चौकट राजा या चित्रपटात स्मिता तळवळकर आणि दिलीप कुलकर्णी यांच्या मुलीची म्हणजेच राणीची भूमिका राजसी बेहरेने साकारली होती. एक बालकलाकार म्हणून राजसीला या चित्रपटातून प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. या चित्रपटाला रिलीज होऊन जवळपास ३० वर्षे उलटले आहेत आणि या चित्रपटातील बालकलाकार राजसी बेहरे आता कशी दिसत असेल, हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.


राजसी बेहरे बालकलाकार म्हणून लोकप्रिय झाली पण आता ती सिनेइंडस्ट्रीतून गायब आहे. मधल्या काळात ती अभिनय क्षेत्रात कार्यरत होती परंतु तिने इंडस्ट्रीतून काढता पाया घेतला.

शालेय शिक्षणात अत्यंत हुशार असलेल्या राजसीने पुढे मुंबई युनिव्हर्सिटी मधून पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर विस्तार टेक्नॉलॉजीस मधून सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची पदवी तिने प्राप्त केली.


सध्या ती हंसा सेक्विटी (Hansa Cequity) या मार्केटिंग कंपनीमध्ये वरिष्ठ सल्लागार या पदावर कार्यरत आहे.

साधारण दहा वर्षांपूर्वी राजसी बेहरे ही चैतन्य बिवलकर यांच्यासोबत लग्नबेडीत अडकली. चैतन्य बिवलकर हे Mindshare fulcrum या कंपनीत कार्यरत आहेत.

Web Title: Do you remember this Chimurdi from the movie 'Chaukat Raja'? Now it is difficult to recognize her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.