'सैराट'मधील 'मंग्या' आठवतोय का?, सध्या करतोय हे काम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 04:28 PM2022-04-08T16:28:48+5:302022-04-08T16:29:10+5:30

Sairat Movie : 'सैराट' या चित्रपटात परशा आणि आर्ची यांच्यासोबतच इतर कलाकारांच्या भूमिकाही लक्षवेधी ठरल्या. याच कलाकारांपैकी एक म्हणजे आर्चीच्या मामाच्या मुलाची भूमिका साकारणारा मंग्या.

Do you remember 'Mangya' from 'Sairat'?, Doing this work now a days | 'सैराट'मधील 'मंग्या' आठवतोय का?, सध्या करतोय हे काम

'सैराट'मधील 'मंग्या' आठवतोय का?, सध्या करतोय हे काम

googlenewsNext

मराठीतील सुपरडुपर हिट चित्रपट 'सैराट'. 'झिंग झिंग झिंगाटच्या तालावर आजही लोक थिरकताना दिसतात. या चित्रपटाच्या कथेपासून सगळ्याच गोष्टी खास होत्या. त्यामुळे तिकीट खिडकीवरही सैराटने सगळे रेकॉर्ड मोडले. या चित्रपटातील रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) आणि आकाश ठोसर (Akash Thosar) यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. या चित्रपटाने नवा इतिहास निर्माण केला होता. यातील डायलॉग आणि गाणीदेखील खूप गाजली होती.

सैराट या चित्रपटात परशा आणि आर्ची यांच्यासोबतच इतर कलाकारांच्या भूमिकाही लक्षवेधी ठरल्या. याच कलाकारांपैकी एक म्हणजे आर्चीच्या मामाच्या मुलाची भूमिका साकारणारा मंग्या. मंग्याची भूमिका अभिनेता धनंजय ननावरे याने साकारली आहे. सैराट चित्रपटानंतर धनंजय ननावरे पुन्हा कोणत्याच चित्रपटात किंवा मालिकेत झळकला नाही.

सैराट चित्रपटानंतर सैराटच्या नावानं चांगभलं या शोमध्ये तो दिसला होता. मात्र त्यानंतर धनंजय ननावरे म्हणजेच मंग्या परत दिसला नाही. त्यामुळे त्याचे चाहते त्याला रुपेरी पडद्यावर पुन्हा पाहण्यासाठी उत्सुक आहेत. दरम्यान एका संकेतस्थळाच्या रिपोर्टनुसार, मंग्या उर्फ धनंजय सध्या बिकट अवस्थेत जगत आहे. त्याला उपजीविका करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशी माहिती समोर येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंग्या हा काही वर्षांपूर्वी एका किराणा दुकानात मजुराचे काम करताना दिसला होता. तसेच सध्या तो ड्राइव्हरकी करून उपजीविका करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 
 

Web Title: Do you remember 'Mangya' from 'Sairat'?, Doing this work now a days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.