'शाळा' चित्रपटातील शिरोडकर आठवतेय ना?, ही चिमुरडी आता दिसते खूप ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 07:00 AM2021-07-16T07:00:00+5:302021-07-16T07:00:00+5:30

२०११ साली रिलीज झालेला शाळा हा चित्रपट तुम्हाला आठवतोय ना. या चित्रपटात जोश्या आणि शिरोडकर यांची प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे.

Do you remember Shirodkar from the movie 'Shala'? This Chimurdi looks very glamorous now | 'शाळा' चित्रपटातील शिरोडकर आठवतेय ना?, ही चिमुरडी आता दिसते खूप ग्लॅमरस

'शाळा' चित्रपटातील शिरोडकर आठवतेय ना?, ही चिमुरडी आता दिसते खूप ग्लॅमरस

googlenewsNext

२०११ साली रिलीज झालेला शाळा हा चित्रपट तुम्हाला आठवतोय ना. या चित्रपटात शाळेतल्या वयात मुलांमधील प्रेमामधील आकर्षण दाखवण्यात आले आहे. लहान वयातील प्रेमातील आकर्षण हा विषय त्याकाळी मराठी चित्रपटसृष्टीत वापरण्यात आला होता. चित्रपटांत जोश्या आणि शिरोडकर यांची प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे. 


मिलिंद बोकील यांच्या ‘शाळा’ कादंबरीवर आधारित असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजय डहाकेने केले होते. हा चित्रपट त्यावेळी खूपच हिट ठरला होता. या चित्रपटात शिरोडकरची भूमिका साकारणारी बालकलाकार केतकी माटेगावकर खूपच लोकप्रिय झाली. आता केतकी खूप मोठी झाली असून आता ती खूपच ग्लॅमरस दिसते. 


केतकी माटेगावकर सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. तसेच ती बऱ्याचदा फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे ती बऱ्याचदा चर्चेत येत असते. गेल्या काही वर्षांत केतकीमध्ये खूप बदल झालेला पहायला मिळतो. तिचा हा ग्लॅमरस अंदाज तिच्या चाहत्यांना खूप भावतो.


शाळा चित्रपटानंतर केतकी माटेगावकर हिने काकस्पर्श, तानी, टाईमपास, टाईमपास २, फुंतरू या चित्रपटात काम केले. शाळा चित्रपटानंतर तिने टाईमपास चित्रपटात साकारलेली प्राजू सर्वांनाच खूप भावली.

या चित्रपटातील दगडू आणि प्राजूची लव्हस्टोरी चाहत्यांना खूपच भावली. आजही ती प्राजू म्हणून प्रचलित आहे. केतकी अभिनेत्रीसोबतच उत्तम गायिकादेखील आहे.

तिने जरासा तू, वारा पहाटवारा, तुम मिल जाओ ही गाणीदेखील गायली आहेत. याशिवाय तिने अनेक चित्रपटातील गाण्यांनाही स्वरसाज दिला आहे.

Web Title: Do you remember Shirodkar from the movie 'Shala'? This Chimurdi looks very glamorous now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.