'सातच्या आत घरात' सिनेमातली ही अभिनेत्री आठवतेय का?, सध्या सिनेइंडस्ट्रीतून आहे गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2023 07:00 AM2023-03-05T07:00:00+5:302023-03-05T07:00:00+5:30

२००४ साली स्मिता तळवलकर निर्मित आणि संजय सुरकर दिग्दर्शित ‘सातच्या आत घरात ‘ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता.

Do you remember this actress from the movie 'Satacha Aat Gharta'?, she is currently missing from the cine industry | 'सातच्या आत घरात' सिनेमातली ही अभिनेत्री आठवतेय का?, सध्या सिनेइंडस्ट्रीतून आहे गायब

'सातच्या आत घरात' सिनेमातली ही अभिनेत्री आठवतेय का?, सध्या सिनेइंडस्ट्रीतून आहे गायब

googlenewsNext

२००४ साली स्मिता तळवलकर निर्मित आणि संजय सुरकर दिग्दर्शित ‘सातच्या आत घरात ‘ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटात सुहास जोशी, गिरीश ओक, मकरंद अनासपुरे, नीना कुळकर्णी, विभावरी देशपांडे, निशिकांत कामत, भारत गणेशपुरे, रिमा लागू, मृण्मयी लागू, मानव कौल, कार्तिका राणे यांनी महत्वाच्या भूमिका बजावल्या होत्या. राखी सावंत हिने या चित्रपटात ‘हिल हिल पोरी हिला’ या रिमिक्स गाण्यावर नृत्य सादर केले होते. या चित्रपटात मधुराचे पात्र कार्तिका राणे हिने साकारले होते. कार्तिकाचा हा पहिलाच मराठी चित्रपट होता मात्र त्याआगोदर तिने हिंदी मालिकेत आणि जाहिरात क्षेत्रात स्वतःची ओळख बनवली होती. 

कार्तिका राणे हिचा जन्म १७ मार्च रोजी झाला होता. ती बॉम्बेच्या सोफिया कॉलेजमध्ये समाजशास्त्राची विद्यार्थिनी होती. कार्तिकाचे काका प्रतापसिंह राव राणे हे गोव्याचे माजी मुख्यमंत्री होते, तर तिचा चुलत भाऊ विश्वजित राणे हे गोव्यातील प्रसिद्ध राजकारणी आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून राणे कुटुंबाची मुळं राजकारणाशी जोडलेली आहेत. कार्तिकाचे काका म्हणजेच प्रतापसिंह राव राणे यांना मराठी नाटकांची आवड आहे. 


कार्तिकाचे शिक्षण मुंबईत झाले. दिसायला अतिशय सुंदर असलेल्या कार्तिकाला मॉडेलिंगचे वेध लागले. यातूनच तिने रिन, विम, निलकमल, फेअर अँड लव्हली अशा जाहिरातींमध्ये काम करण्यास सुरुवात केली. आकर्षक चेहरा आणि सहजसुंदर अभिनय यामुळे तिला हिंदी मालिका चित्रपटातून प्रमुख भूमिका मिळू लागल्या. कार्तिका हिंदी चित्रपटातून फारशी कमाल घडवू शकली नाही मात्र छोट्या पडद्यावर तिने मोठी प्रसिद्धी मिळवली होती. ही प्रसिद्धी मिळवत असताना कार्तिकाला सातच्या आत घरात या मराठी चित्रपटाने अभिनयाची संधी देऊ केली. या एका चित्रपटामुळे मराठी चित्रपटाची नायिका अशी ओळख तिने मिळवली. हा तिने अभिनित केलेला एकमेव मराठी चित्रपट ठरला.

कार्तिका ‘कंगन’, ‘हम परदेसी हो गये’ , ‘कॅप्टन व्योम’, ‘द ग्रेट मराठा’, ‘तेरे मेरे सपने’, ‘गुबारे’, ‘दीदी का दुल्हा’, ‘न्याय’, ‘ख्वाब’, ‘एक से बढकर एक’ अशा मालिकांमधून, चित्रपटांमधून छोट्या आणि मोठ्या पडद्यावर झळकली. २००८ साली प्रदर्शित झालेल्या ‘हुल्ला’ चित्रपटानंतर कार्तिका अभिनय क्षेत्रापासून दुरावली. कार्तिका राणे कुठे आहे आणि काय करते याबद्दलही कोणालाच काही माहिती नाही.

Web Title: Do you remember this actress from the movie 'Satacha Aat Gharta'?, she is currently missing from the cine industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.