'धडक' सिनेमाचं ग्लॅमर 'सैराट'प्रमाणेच याड लावणार का?, धडकच्या ट्रेलरबाबत काय वाटतं मराठी कलाकारांना…
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2018 04:43 AM2018-06-12T04:43:12+5:302018-06-12T10:13:32+5:30
मराठीतील सुपरडुपर हिट सिनेमा म्हणजे 'सैराट'.'झिंग झिंग झिंगाट'च्या तालावर या सिनेमानं रसिकांना अक्षरक्षा याड लावलं. सिनेमाच्या कथेपासून सगळ्याच गोष्टी ...
म ाठीतील सुपरडुपर हिट सिनेमा म्हणजे 'सैराट'.'झिंग झिंग झिंगाट'च्या तालावर या सिनेमानं रसिकांना अक्षरक्षा याड लावलं. सिनेमाच्या कथेपासून सगळ्याच गोष्टी खास होत्या. त्यामुळे तिकीट खिडकीवरही सैराटने सगळे रेकॉर्ड मोडले. या सिनेमानं बॉलिवूडवरही मोहिनी घातली. सैराटची रुपेरी पडद्यावरील जादू पाहून बॉलिवूडचा डॅडी दिग्दर्शक करण जोहरने सैराटचा हिंदीत रिमेक करण्याचं ठरवलं. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची कन्या जान्हवी कपूर आणि अभिनेता इशान खट्टर यांना घेऊन 'सैराट' सिनेमाचा रिमेक 'धडक' सिनेमाची घोषणा करणने केली होती.तेव्हापासूनच 'धडक' सिनेमाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. हा सिनेमा कसा असेल, त्याची कथा, गाणी याबाबत रसिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर 'धडक' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. धडकच्या ट्रेलरला रसिकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळतो आहे. याबाबत मराठी कलाकारांना काय वाटतं जाणून घेऊया…
मनवा नाईक
'धडक' सिनेमाचा ट्रेलर चांगला आणि सुंदर आहे. मात्र तरीही त्यात आर्ची म्हणजेच रिंकू नसल्याने चुकल्याचुकल्या सारखं वाटतंय. महाराष्ट्राच्या मातीतील गोडवा धडकमध्ये नाही. महाराष्ट्राचा झोपाळा, रान-शेत शिवार, विहीर जे काही सैराटमध्ये होतं ते धडकमध्ये दिसत नाही. 'धडक' सिनेमात महल, पॅलेस दिसतो जे काही पटत नाही. धर्मा प्रॉडक्शनमुळे सिनेमा हिटसुद्धा होईल. दुसरीकडे सैराटचा क्लायमेक्स सीन आणि धडकचा क्लायमेक्स याची चर्चा होते. मात्र याबाबत संपूर्ण व्हिजन दिग्दर्शकाचं असतं. त्यात तुलना होऊच शकत नाही.
हेमांगी कवी
धडक सिनेमाचा ट्रेलर इतका आकर्षक वाटला नाही.सैराटची जादू आजही कायम आहे. धडकमध्ये राजस्थानी संस्कृतीत झिंगाट हे मराठमोळं गाणं वेगळंच वाटतं. इशान ट्रेलरमध्ये छान वाटतो. मात्र जान्हवीला अतिएक्सपोझ केल्यासारखे वाटते.
अदिती सारंगधर
धडक सिनेमाचा ट्रेलर चकाचक वाटतोय. मला तर फार आवडला. सैराटच्या धर्तीवर धडक करण्याचा चांगला प्रयत्न करणने केला आहे. राजस्थानी संगीत आवडलं.हिंदीत असल्यामुळे नायक आणि नायिका थोडं हिंदी रसिकांच्या टेस्टनुसार दाखवणं गरजेचं होते. बॉलिवूडचा एक वेगळा स्तर आहे.त्यामुळे त्याला साजेसं नायक नायिका दाखवणं गरजेचं होतं.एखाद्या ग्लॅमरस नायिकेला वेगळ्या अंदाजात दाखवण्याचा धोका बॉलिवूड घेऊ शकत नाही.त्यामुळेच सैराटची रिंकू आणि धडकची जान्हवी यांत फरक दिसेल.त्यामुळे ट्रेलरवरुन आत्ताच लोकांनी कमेंट करू नये. 'वीरें दे वेडींग' ट्रेलर पाहून अनेकांनी नाकं मुरलडली होती.मात्र सिनेमाने 100 कोटींचा बिझनेस केला.धडकच्या रिलीजच्या प्रतिक्षेत मी आहेत नक्कीच बघणार.अनेकांची मेहनत असते ट्रेलर वरून काही ठरवणे चुकीचे ठरेल.
अशोक शिंदे
'धडक' सिनेमा हा सैराटप्रमाणेच सुपरहिट होणार असं मला वाटते.इशान खट्टर आणि जान्हवी दोघेही आवडले. हा सिनेमा नव्या पीढीला आवडेल अशारितीने बनवला त्यामुळेच धर्मा प्रोडक्शनने दोन नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. याच निमित्ताने मराठी संहिता जगभर पसरणार आहे.ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे आपलं ते संगीत हिंदी सिनेमात वापरल्यामुळे खरंच खूप भारी वाटतं. सोशल मीडियावर धडकचा शेवट बदलण्यात यावा असे बोलले जात असेल तरीही धडकचा शेवट तोच असवा जो सैराटमध्ये होता. कारण तो एकमेव पाईंट होता.
मयूरी देशमुख
ट्रेलरवरुन दोन सिनेमांची तुलना करणं योग्य होणार नाही. मात्र सैराट हा महाराष्ट्राचा लाडका सिनेमा. धडकचा ट्रेलर पाहून जान्हवी आणि इशान या दोघांनीही आपापल्या भूमिकांना न्याय दिल्यासारखं वाटतंय.सिनेमातील गाण्यांमध्येही मराठीचा गोडवा असून ते आपलंसं वाटतं. मुळात मराठी सिनेमाचा बॉलिवूडला रिमेक करावा वाटला हीच एकदम भारी गोष्ट होती. चांगलं ते प्रत्येकाला आवडतं. त्यांनीही तेच केलं. या सिनेमाला कसा प्रतिसाद मिळेल हे सांगणं सध्या कठीण आहे.मात्र आगामी काळात नक्कीच हा सिनेमा कोणती उंची गाठणार हे कळेल.एक मात्र नक्की की धडकच्या ट्रेलरमध्ये आर्ची परशा कुठेही दिसले नाहीत. यांत त्यांनी दोघांना वेगळ्या पद्धतीने दाखवल्याने तुलना अशक्यच.