तुम्हाला फिल्ममेकर होण्याचं स्वप्न पूर्ण करायचे? मग येथे लॉग आॅन करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2017 02:52 PM2017-06-20T14:52:32+5:302017-06-20T20:25:55+5:30

लघुपटाच्या निर्मितीचा जणू काही प्रत्येकालाच छंद जडला आहे. आपल्या सवंगड्यांमधीलच अभिनयाची जाण असलेले आणि सभोवतालच्या नयनरम्य वातावरणाचे लोकेशन ठरवून ...

Do you want to dream of becoming a filmmaker? Then log in here! | तुम्हाला फिल्ममेकर होण्याचं स्वप्न पूर्ण करायचे? मग येथे लॉग आॅन करा!

तुम्हाला फिल्ममेकर होण्याचं स्वप्न पूर्ण करायचे? मग येथे लॉग आॅन करा!

googlenewsNext
ुपटाच्या निर्मितीचा जणू काही प्रत्येकालाच छंद जडला आहे. आपल्या सवंगड्यांमधीलच अभिनयाची जाण असलेले आणि सभोवतालच्या नयनरम्य वातावरणाचे लोकेशन ठरवून समाजाभिमुख लघुपटांची निर्मिती करण्याचे धाडस बºयाच मंडळींकडून केले जात आहे. परंतु उत्तम व्यासपीठ उपलब्ध नसल्याने त्यांच्यातील कौशल्य जगासमोर येत नसल्याची खंतही त्यांच्याकडून नेहमीच बोलून दाखविली जात आहे. अशाच होतकरू आणि हुरहुन्नरी मंडळींना आम्ही  व्यासपीठ उपलब्ध करून देणार असून, त्यांचे कौशल्य जगाला दाखवून देण्याची संधी देणार आहोत.   

होय, आम्ही जगातले सगळ्यात भव्य असे मराठी शॉर्ट फिल्म्स फेस्टिव्हलचे आयोजन करीत असून, तुमच्यातील गुणी कलाकार आणि निर्माता जगाला दाखवून देण्याची संधी उपलब्ध करून देत आहोत. विशेष म्हणजे, तुम्ही कुठे नोकरी करता?, तुमचा हुद्दा काय?, तुमचे वय काय? तुम्ही शिक्षक आहात की इंजिनिअर? याचा आम्ही विचार करणार नाही. केवळ तुमच्यामध्ये लघुपट (शॉर्ट फिल्म) बनविण्याचं आणि निर्माता बनण्याचा तो जोश असायला हवा. जर, तुमचं काम आम्हाला पसंत पडलं तर तुमचं चित्रपट निर्मितीचं स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत एक पार्टनर म्हणून असणार आहोत. 



शिवाय, अन्य बक्षिसे आहेतच. जसे की, ‘मॅकबूक एअर लॅपटॉप्स, प्रोफेशन कॅमकॉर्डर्स आणि स्मार्टफोन.’ मग, विचार कसाला करता, सहभागी व्हा जगातल्या या सगळ्यात भव्य अशा मराठी लघुपट निर्मितीच्या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेतून तुम्हाला तुमच्यातील कौशल्य दाखवून देण्याचे हे उत्तम व्यासपीठ असेल. तसेच स्वप्न पूर्ण करून उत्तुंग भरारी घेण्याची संधीही असेल. जर तुम्ही या स्पर्धेसाठी इच्छुक असाल तर लगेचच आमच्या www.7rcfilms.com या वेबसाइटवर नोंदणी आणि शॉर्टफिल्म सबमिट करण्यासाठी लॉग आॅन करा.

त्याचबरोबर तुमच्या परिचयाचा कोणी होतकरू लघुपट निर्माता असेल तर त्याला ही लिंक पाठवायला विसरू नका. कारण १४ जुलै २०१७ रोजी सायंकाळी ६ वाजता नोंदणी बंद होणार आहे, तर लगेचच आमच्या वेबसाइटला भेट देऊन तुमचे नाव निश्चित करा. चित्रपट निर्मितीसारख्या क्षेत्रात करिअर करण्याची ही नामी संधी असून, त्यात तुमचा सहभाग अपेक्षित आहे. 

Web Title: Do you want to dream of becoming a filmmaker? Then log in here!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.