'धनंजय माने इथेच राहतात का?', वाचा या सुपरहिट डायलॉग मागचा भन्नाट किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 07:00 AM2023-09-09T07:00:00+5:302023-09-09T07:00:00+5:30

Ashi Hi Banva Banvi : 'अशी ही बनवा बनवी' चित्रपट १९८८ साली रिलीज झाला. या सिनेमातील काही डायलॉग्ज खूप सुपरहिट ठरले आहेत.

'Does Dhananjay Mane live here?' Do you know the interesting story of this superhit dialogue? | 'धनंजय माने इथेच राहतात का?', वाचा या सुपरहिट डायलॉग मागचा भन्नाट किस्सा

'धनंजय माने इथेच राहतात का?', वाचा या सुपरहिट डायलॉग मागचा भन्नाट किस्सा

googlenewsNext

'अशी ही बनवा बनवी' (Ashi Hi Banva Banvi ) चित्रपट १९८८ साली रिलीज झाला. त्यावेळी या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. आज या चित्रपटाला ३० वर्षे उलटली असली तरी आजही या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या सिनेमामधील प्रत्येक पात्र आजही प्रेक्षकांना चांगलेच लक्षात आहे. अगदी अशोक सराफ यांच्यापासून ते लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन पिळगावकर यांच्यापासून अश्विनी भावेंपर्यंत सगळ्यांनीच रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. याशिवाय या सिनेमातील काही डायलॉग्जही सुपरहिट ठरले आहेत. त्यातीलच एक डायलॉग म्हणजे 'धनंजय माने इथेच राहतात का?'. या डायलॉगमागे एक इंटरेस्टिंग किस्सा आहे.

सिनेमा बनवताना हा डायलॉग कसा तयार झाला याचा किस्सा अभिनेते किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितला होता. किरण माने यांचे एक मित्र आहेत ज्यांच्या वडिलांच्या बाबतीत हा किस्सा घडला आहे. खरेतर यापूर्वी या पात्रासाठी आडनावाची गरज जाणवली नव्हती. पण परशा जेव्हा दार ठोठावतो, तेव्हा त्यानं पूर्ण नाव घ्यायची गरज आहे. त्याला कुठले आडनाव शोभेल? याचा सचिन पिळगांवकर – वसंत सबनीस वगैरे लोक व्ही. शांताराम यांच्या ऑफीसमध्ये विचार करत बसले होते. बरीच आडनावे सुचत होती पण कुणाचं समाधान होत नव्हतं…

इतक्यात व्ही. शांताराम दाराकडे पाहून म्हणाले, या या माने.. काय काम काढलंत? व्ही. शांताराम यांचे सी.ए. किसन माने आले होते. त्यांना काही कागदपत्रांवर व्ही. शांताराम यांच्या सह्या हव्या होत्या. त्या हाकेने चर्चेच्या वेळी असे टायमिंग साधले होते की त्यांच्या सह्या होईपर्यंत सचिनजी आणि वसंत सबनीस यांनी ठरवून टाकले की त्या पात्राचे आडनाव माने हेच असेल ! मिटींग संपता-संपता व्ही. शांताराम यांनी किसन मानेंना पुन्हा त्यांच्या केबिनमध्ये बोलावून घेतले आणि हसत-हसत विचारले की ''माने तुमचं आडनाव आमच्या सिनेमातल्या 'धनंजय' या पात्राला वापरायला तुमची काही हरकत नाही ना?'' केबिनमध्ये हास्यकल्लोळ उसळला आणि संपूर्ण मराठी मुलखात हास्यकल्लोळ उसळवणारा तो ‘अजरामर’ डायलाॅग जन्माला आला 

 “धनंजय माने इथेच रहातात का?” किसन माने यांचे चिरंजीव विक्रम माने माझ्या फ्रेन्डलिस्टमध्ये आहेत… त्यांनी एक दिवस इनबाॅक्समध्ये ठकठक केलs “किरण माने इथेच रहातात का?” …आणि मला ही घटना सांगितली. लै भारी वाटलं… म्हन्लं, मी हा किस्सा फेसबुकवरून दोस्त लोकांना सांगू का? तुमची काही हरकत नाही ना? नाही तर पुन्हा म्हणाल, “हा शुद्ध हलकटपणा आहे माने !”- किरण माने.
 

Web Title: 'Does Dhananjay Mane live here?' Do you know the interesting story of this superhit dialogue?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.