डबलरोल धमाका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2016 07:42 AM2016-03-06T07:42:28+5:302016-03-06T00:42:28+5:30

बॉलीवुड असो या मराठी चित्रपट डबलरोलची भूमिका असणं म्हणजे फुल इंटरन्मेंट असतं. एकाच व्यक्तीच्या दोन भुमिका असल्यामुळे चित्रपटात उडणारा ...

Doubleroll Explosion | डबलरोल धमाका

डबलरोल धमाका

googlenewsNext
लीवुड असो या मराठी चित्रपट डबलरोलची भूमिका असणं म्हणजे फुल इंटरन्मेंट असतं. एकाच व्यक्तीच्या दोन भुमिका असल्यामुळे चित्रपटात उडणारा गोंधळ,मजा, मस्ती व त्यामुळे होणारा विनोदाचा कल्ला हा इतर सामाजिक व व्यावसायिक चित्रपटांपेक्षा नक्कीच वेगळा असतो. अशा डबल रोल असणाºया  चित्रपटांना अडल्ट,नॉनअडल्ट असा कोणाता ही वर्ग नसतो. लहान, तरूण, वयस्कर सर्वच वयोगटातील प्रेक्षक या चित्रपटांचा आनंद घेवू शकतात. जसे की, बॉलीवुडमध्ये चालबाज, डुप्लीकेट, जुडवा, कहो ना प्यार है, धूम ३, तनु वेडस मनू २, प्रेम रतन धन पायो या डबल रोल चित्रपटांनी बॉक्सआॅफीसवर करोडोंचा गल्ला कमविला आहे. तर मराठी इंडस्ट्रीमध्येदेखील डबलरोल असणाºया चित्रपटांनादेखील प्रचंड यश मिळाले आहे. यापलीकडे ही जाउन लक्ष्मीकांत बेर्डे,अशोक सराफ, सचिन पिळगावकर,महेश कोठारे यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या डबल रोल भूमिकेमुळे नव्वदीमध्येदेखील मराठी इंडस्ट्रीचे नाव आवुर्जन घेत असत. तसेच सध्याचे रितेश देशमुख, भरत जाधव, सिध्दार्थ जाधव, सचिन खेडेकर या कलाकारांच्या दुहेरी भूमिकेमुळे मराठी इंडस्ट्रीला तर चार चाँद लागले आहेत हे नक्की. असेच काही डबल रोल असणाºया मराठी चित्रपटांचा लोकमत सीएनएक्सने घेतलेला आढावा.

धडाकेबाज-१९९० साली प्रदर्शित झालेला महेश कोठारे दिग्दर्शित धडाकेबाज हा कॉमेडी मराठी चित्रपट नक्कीच आजच्या तरूणांना बालवयात घेवून जाणारा चित्रपट आहे.मुलांनो, लक्ष्मीकांत बेर्डेंचा तो बाटलीतला गंगाराम आठवतो का? येस.. याच चित्रपटाने अक्षरश: धमाल उडवून दिली होती.आज ही त्या बाटलीतील लक्ष्मीकांत बेर्डे यांची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे. 

 

आमच्या सारखे आम्हीच-१९९० साली सचिन पिळगावकर दिग्दर्शित आमच्यासारखे आम्हीच या चित्रपटाने धमालच उडवून दिली होती. अशोक सराफ व सचिन पिळगावकर यांसारख्या दिग्गज कलाकरांच्या दुहेरी भूमिकेमुळे अक्षरश: विनोदाचा पाउस प्रेक्षकांनी अनुभवला होता. या कॉमेडी चित्रपटात वर्षा उसगांवकर व निवेदिता सराफ या सुंदर अभिनेत्रींचा समावेश होता.



शेम टू शेम-१९९१ साली पुरूषत्तोम बेर्डे दिग्दर्शित शेम तू शेम हा चित्रपटाच्या नावतच सगळ काही असल्याचे दिसते. या चित्रपटात तर लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या डबल रोल भूमिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. या चित्रपटात विजय चव्हाण, प्रिया अरूण या कलाकारांचा देखील अभिनय पाहायला मिळाला.



जत्रा-केदार शिंदे दिग्दर्शित जत्रा या चित्रपटाने प्रेक्षकांना पुन्हा मराठी इंडस्ट्रीकडे वळविले. या चित्रपटातील कोंबडी पळाली या गाण्याने तर प्रेक्षकांना वेड लावून ठेवेल होते. अभिनेता भरत जाधव यांच्या डबल रोलच्या भूमिकेमुळे तसेच हयालागाड, त्यालागाड अशा गावांच्या नावांमुळे या चित्रपटांनेदेखील प्रेक्षकांना आपलेसे करून टाकले. २००६ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात सिध्दार्थ जाधव, क्रांती रेडकर या कलाकारांचा देखील समावेश होता. 



 पितृऋण- या चित्रपटात सचिन खेडेकर यांचा डबल रोल पाहायला मिळाला होता. यांच्या दुहेरी भूमिकेमुळे पितृऋण हा चित्रपट मनाला चटका लावून गेला. या चित्रपटातील वडिल व मुलगा यांच्यातील भावनिक नात्यामुळे डबलरोल असणारा हा भावनिक चित्रपट देखील प्रेक्षकांना भावला. २०१३ साली प्रदर्शित झालेला नितीन भारव्दाज दिग्दर्शित पितृऋण हा चित्रपट सुधा मुर्ती यांच्या कन्नड कादंबरीवर आधारित होता. या चित्रपटात दिग्गज अभिनेत्री तनुजा यांचा अभिनय मराठी चित्रपटात पाहायला मिळाला.



लय भारी- या चित्रपटात रितेश देशमुखचा डबल रोल पाहायला मिळाला. या चित्रपटाचे कौतुक करावे तेवढे कमीच. कारण या चित्रपटात तर बॉलीवुड अभिनेता सलमान खानला देखील अभिनय करण्यास मोह पडला. निशिकांत कामत दिग्दर्शित लय भारी हा चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटात शरद केळकर, राधिका आपटे, जेनेलिया डिसूजा या कलाकारांचा समावेश होता. तसेच रितेशच्या या दुहेरी भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर रेकार्ड ब्रेकच केला.खरंचं,या चित्रपटामुळे मराठी इंडस्ट्रीचेदेखील लय भारी ठरली.




                                              
 

Web Title: Doubleroll Explosion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.