​डॉ. आनंद नाडकर्णी आणि मांजाच्या टीमने पालक आणि मुलांशी साधला सुसंवाद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2017 11:33 AM2017-07-27T11:33:36+5:302017-07-27T17:03:36+5:30

मांजा चित्रपटाच्या टीमने नुकताच पुण्यामध्ये एक कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाचा विषय हा चित्रपटातील विषयाशी समन्वय साधणारा होता. आजच्या ...

Dr. Anand Nadkarni and Manza's team interacted with parents and children | ​डॉ. आनंद नाडकर्णी आणि मांजाच्या टीमने पालक आणि मुलांशी साधला सुसंवाद

​डॉ. आनंद नाडकर्णी आणि मांजाच्या टीमने पालक आणि मुलांशी साधला सुसंवाद

googlenewsNext
ंजा चित्रपटाच्या टीमने नुकताच पुण्यामध्ये एक कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाचा विषय हा चित्रपटातील विषयाशी समन्वय साधणारा होता. आजच्या पिढीतील मुलं, त्यांच्या सभोवतालचे वातावरण, मित्र या सर्वांचा त्यांच्यावर होणारा चांगला अथवा वाईट प्रभाव आणि याचे कारण म्हणजे पालक आणि पाल्य यांच्यातील असलेला अबोला किंवा त्यांच्यात न होणारे गरजेचे असे संवाद. मग यातून निर्माण होणारे परिणाम, प्रसंग आणि त्यातून कसे बाहेर पडावे किंवा योग्य असे निर्णय कसे घ्यावे या सर्व गोष्टींचा आढावा घेणारे एक चर्चासत्र घडून आले.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते सुप्रसिद्ध मनोविकासतज्ज्ञ आंनद नाडकर्णी. त्यांनी पालकांना असणाऱ्या समस्या आणि मुलांवर होणारे परिणाम, त्यासाठी काय उपाययोजना कराव्यात याचे योग्यरित्या मार्गदर्शन दिले. या सोबतच कार्यक्रमाला तज्ज्ञ संवादक राजीव तांबे, सविता पानसरे (सल्लागार, एम ए., पुणे विद्यापीठ), डॉ. शिरीष साठे आणि संजीवनी विद्यालय, पांचगणी याचे मुख्याध्यापक डॉ. देशपांडे यांची उपस्थिती लाभली. या सर्वांनी सुद्धा पालकांशी संवाद साधला. कार्यक्रमाला चित्रपटातील कलाकार अश्विनी भावे, सुमेध मुद्गलकर आणि रोहित फाळके यासोबतच दिग्दर्शक जतीन वागळे, निर्माते के आर हरीश आणि चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते नितीन केणी सुद्धा उपस्थित होते.
मांजा' चित्रपटाची कथा, पटकथा, आणि दिग्दर्शन जतिन वागळे यांनी केलं आहे. दिग्दर्शकाचे परफेक्शन यातील गाण्यांमधून व गोष्ट सांगण्याच्या पद्धतीवरून नक्कीच दिसून येईल. 'इंडिया स्टोरीज' निर्मित मांजा चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच त्रिलोक मल्होत्रा आणि के. आर. हरीश या हिंदी सिनेसृष्टीतील निर्मात्यांनी मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे संवाद उपेंद्र सिधये यांनी लिहिले आहे. नितीन केणी आणि मनीष वसिष्ट यांची एमएफडीसी ही कंपनी या चित्रपटाचे वितरणसाहाय्य्य करणार आहेत.

Also Read : ​आणि अशाप्रकारे सुरू झाला मांजाचा प्रवासः जतिन वागळे

Web Title: Dr. Anand Nadkarni and Manza's team interacted with parents and children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.