तू आमच्या समोर नसणार पण पाठीशी असणार म्हणत डॉ. गिरिश ओक यांनी आईसाठी लिहिली ही कविता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:53 PM2021-03-23T16:53:18+5:302021-03-23T16:54:39+5:30

डॉ. गिरिश ओक यांच्या आईचे नुकतेच निधन झाले. त्यांनी आईसाठी लिहिलेली कविता वाचून तुमच्या डोळ्यांत नक्कीच पाणी येईल.

dr girish oak writes emotional poem for mother | तू आमच्या समोर नसणार पण पाठीशी असणार म्हणत डॉ. गिरिश ओक यांनी आईसाठी लिहिली ही कविता

तू आमच्या समोर नसणार पण पाठीशी असणार म्हणत डॉ. गिरिश ओक यांनी आईसाठी लिहिली ही कविता

googlenewsNext
ठळक मुद्दे"आई" तू आमच्या समोर नसणार आहेस पण आमच्या पाठीशी असणार आहेस माहितीये आम्हाला.

मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते डॉ.गिरिश ओक यांच्या आईचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाविषयी गिरिश ओक यांनीच एक पोस्ट लिहून सांगितले आहे. तसेच सोशल मीडियाद्वारे त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

"सौ शशीकला रत्नाकर ओक" माझी आई जन्म २२ सप्टेंबर १९३७ परवाच २१ मार्च २०२१ ला मला आत्मनिर्भर करून गेली आणि कधीतरी कोणाचं...

Posted by Dr. Girish Oak on Monday, March 22, 2021

गिरिश ओक यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की,   
"सौ शशीकला रत्नाकर ओक"
माझी आई जन्म २२ सप्टेंबर १९३७ परवाच २१ मार्च २०२१ ला मला आत्मनिर्भर करून गेली आणि कधीतरी कोणाचं तरी सांत्वन करण्यासाठी मीच केलेली ही कविता माझंच सांत्वन करायला धावून आली आणि माझ्यात सकारात्मकता भरून गेली.
"इथला धीर पुरेनासा होतो
इथलं औषध लागेनासं होतं
इथली हवा मानवेनाशी होते
मग जगण्याची इच्छाच नाहीशी होते
बट डोन्ट से द पेशंट ईझ डेड
बट द पेशंट ईझ ट्रान्सफर्ड टू सूपर आय सी यू
तिथला धीर खोटा खोटा नसतो
अमृत फार्मास्युटिकल्सच्या औषधांमधे भेसळ नसते
अहो क्वॅालिटी कंट्रोल बोर्डावर चक्क अश्विनी कुमार बसलेले असतात नं !
आणि हवं नको ते बघायला मुलं नातवंडं नाही तर चक्क आई बाबा आजी आजोबा खापर खापर सगळेच
तिथल्या हवेत पोल्यूशन नसतं
सगळंच कसं इथल्या पेक्षा अपग्रेडेड असतं
तिथे जगण्यासाठी शरीराची गरजच नसते
मग ते थकलं काय नी नसलं काय
फक्त इथल्या आय सी यू च्या दाराच्या काचेतून तुम्ही पेशंटला बघू शकतात हेल्पलेसपणे
ती सोय (?) सूपर आय सी यू ला नाही
पण काळजी करू नका
केस आता
खुद्द डॅाक्टर धन्वंतरींच्या हातात आहे
सो डोन्ट वरी "
---------------------------
"आई" तू आमच्या समोर नसणार आहेस पण आमच्या पाठीशी असणार आहेस माहितीये आम्हाला.

Web Title: dr girish oak writes emotional poem for mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.