डॉ. तात्याराव लहाने यांच्या बायोपिकची रिलीज टेड पुढे ढकलली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 07:32 AM2017-09-12T07:32:50+5:302017-09-12T13:02:50+5:30

डॉ. तात्याराव लहाने यांच्या कारकिर्दीला मानवंदना देणारा आणि त्यांच्या संघर्षात्मक जीवनावर दृष्टिक्षेप टाकणारा "डॉ. तात्या लहाने ... अंगार... पॉवर ...

Dr. Tatyarao Lahein's biopic postponed Ted postponed | डॉ. तात्याराव लहाने यांच्या बायोपिकची रिलीज टेड पुढे ढकलली

डॉ. तात्याराव लहाने यांच्या बायोपिकची रिलीज टेड पुढे ढकलली

. तात्याराव लहाने यांच्या कारकिर्दीला मानवंदना देणारा आणि त्यांच्या संघर्षात्मक जीवनावर दृष्टिक्षेप टाकणारा "डॉ. तात्या लहाने ... अंगार... पॉवर इज विदीन" हा सिनेमा ६ ऑक्टोबर २०१७ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र आता या चित्रपटाची टेड पुढे ढकलण्यात आली आहे. अजून चित्रपटाचे काम बाकी असल्यामुळे आता हा चित्रपट नोव्हेंबरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रत्रपटाचे दिग्दर्शन विराग मधुमालती वानखडे यांनी केले आहे. अभिनेता मकरंद अनासपुरे आणि अलका कुबल यांच्यासोबत सिनेमात निशिगंधा वाड, भारत गणेशपुरे, रमेश देव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिनेमाची कथा-पटकथा- संवाद विराग यांनी स्वतः लिहिले असून सिनेमाचं संगीत 'एक हिंदुस्थानी' या संगीतकाराने केलं आहे. डॉ. लहाने यांच्यासारखं निस्वार्थ समाजकार्य करणाऱ्या व्यक्तीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून "एक हिंदुस्थानीने"  प्रसिद्धी पासून लांब राहण्याचे पसंत केले आहे. 
मसालापटाच्या लाटेत मराठी प्रेक्षक आशयघन विषय शोधू लागले आहेत. अशा चोखंदळ रसिकांसाठी डॉ. तात्या लहाने... अंगार पॉवर इज विदीन हा सिनेमा उत्तम पर्वणी ठरणार आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत जनसमुदायामध्ये आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या डॉ. तात्याराव लहाने यांच्यावर तयार झालेली "बायोपिक" आजच्या तरुणाईसाठी मार्गदर्शक ठरणारी आहे. डॉ. लहानेंचा ध्यास, कष्ट, संघर्ष एकूणच त्यांच्या आयुष्यातील नाटय़ इतके भुरळ घालणारे आहे की त्यापुढे काल्पनिक कथा तकलादू वाटू लागते.  उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या डॉ. लहानेंचा जीवनपट दोन-अडीच तासांच्या चित्रपटात बसवण्याचं आव्हान सिनेमाचे निर्माता-दिग्दर्शक विराग मधुमालती वानखडे यांनी स्वीकारलं आहे. डॉ लहाने यांच्या कारकिर्दीला मानवंदना देण्यासाठी भारतीय चित्रपट सृष्टीत पहिल्यांदा रिले सिंगिंगच्या माध्यमातून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये विश्वविक्रम नोंदविला. 'काळोखाला भेदून टाकू जीवनाला उजळून टाकू'... हे गाणं सिनेमात गायिका साधना सरगम आणि विराग यांनी स्वतः गायलं असून 'एक हिंदुस्थानी' यांनी संगीतबद्ध केलं आहे. तसेच सिनेमातील एका गाण्याला केतकी माटेगावकर हिने देखील आवाज दिला आहे. अभिनेता मकरंद अनासपुरे डॉ. लहाने यांच्या प्रमुख भूमिकेत असून आणि त्यांच्या आई अंजलीबाईंच्या भूमिकेत अलका कुबल आहेत. यांच्यासोबत सिनेमात निशिगंधा वाड, भारत गणेशपुरे, रमेश देव यांच्या विशेष भूमिका आहेत. 

Web Title: Dr. Tatyarao Lahein's biopic postponed Ted postponed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.