Exclusive एन.डी स्टुडिओत झाली ट्रकभर स्वप्न शुट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2016 08:18 AM2016-07-28T08:18:27+5:302016-07-28T13:48:27+5:30

   प्रियांका लोंढे                           नितीन चंद्रकांत देसाई हे ...

A dream trip across a truck in Exclusive ND Studio | Exclusive एन.डी स्टुडिओत झाली ट्रकभर स्वप्न शुट

Exclusive एन.डी स्टुडिओत झाली ट्रकभर स्वप्न शुट

googlenewsNext
 
r /> प्रियांका लोंढे 
           
             नितीन चंद्रकांत देसाई हे नाव चित्रपटसृष्टीत सुवर्णाक्षरांनी लिहीले जावे असेच आहे. याचे कारण म्हणजे ,नितीन देसाई यांचे चित्रपटांमध्ये दिसणारे भव्य-दिव्य सेट्स त्या सिनेमांना एका वेगळ््या उंचीवर घेऊन जातात. डोळे दिपुन जातील असे आरस्पानी सौंदर्य यांच्या सेट्समध्ये असते. हम दिल दे चुके सनम, देवदास, जोधा अकबर, प्रेम रतन धन पायो या चित्रपचटांमध्ये आपण त्यांच्या सेट्सची जादु अनुभवलीच आहे. नितीन देसाई हे कला दिग्दर्शक आहेतच परंतू त्यांचे प्रोडक्शन हाऊस देखील आहे. आगामी ट्रकभर स्वप्न हा सिनेमा नितीन देसाई लवकरच सर्वांच्या भेटीला घेऊन येत आहेत.

         

या सिनेमाची सर्वत्र चर्चा तर सुरु झालीये. स्मिता तांबे, क्रांती रेडकर, मकरंद देशपांडे, मानोज जोशी यांच्या प्रमुख भुमिका असलेला हा चित्रपट नितीन देसाई यांच्या एन.डी स्टुडीओत चित्रीत करण्यात आला आहे. याबाबत अभिनेत्री स्मिता तांबेने सीएनएक्सला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये या गोष्टीचा उलगडा केला. स्मिता म्हणाली, नितीन देसाई यांच्या प्रोडक्शनमध्ये काम करण्याचा अनुभव खुप वेगळा अन छान होता. आम्ही संपुर्ण फिल्मचे शुटिंग एन.डी स्टुडीओत केले आहे. जेवहा आम्ही प्रथम सेटवर गेलो तेव्हा तो सेट पाहुनच म्हणालो की अपल्याला नक्कीच काहीतरी वेगळे करायला मिळणार आहे. एवढा अप्रतिम तो सेट होता. स्टुडिओमध्ये एक झोपटपट्टी तयार करण्यात आली होती अन तिथेच आम्ही संपुर्ण सिनेमाचे शुटिंग केले. तुम्ही जेव्हा रिअल लोकेशन्सवर शुटिंगसाठी जाता तेव्हा कधी कधी फारच कंजेस्टेड वाटते. परंतू या सेटवर आम्हाला छान शुटिंग करता आले आणि सतत आम्ही एकमेकांसोबत असल्याने आमच्यात खुप छान बाँडिंग झाले. नितीन देसाइर् यांच्या एन.डी स्टुडीओत उभारण्यात आलेल्या या सेटवर ट्रकभर स्वप्न तर शुट झाली आता फक्त वाट पहायची ती पडद्यावर पहायला कधी मिळणार याचीच.

          

Web Title: A dream trip across a truck in Exclusive ND Studio

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.