​लवकरच कान्हा प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2016 12:23 PM2016-12-10T12:23:17+5:302016-12-10T12:23:17+5:30

कान्हा या चित्रपटाची काही हिवसांपूर्वी बरीच चर्चा झाली होती. वैभव तत्ववादी, गश्मीर महाजनी, गौरी नलावडे अशी स्टारकास्ट असलेला कान्हा ...

Early Cannes visitor's meet | ​लवकरच कान्हा प्रेक्षकांच्या भेटीला

​लवकरच कान्हा प्रेक्षकांच्या भेटीला

googlenewsNext
न्हा या चित्रपटाची काही हिवसांपूर्वी बरीच चर्चा झाली होती. वैभव तत्ववादी, गश्मीर महाजनी, गौरी नलावडे अशी स्टारकास्ट असलेला कान्हा हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर चांगला चालला. प्रेक्षकांनी देखील या चित्रपटाला पसंती दर्शविली. अवधूत गुप्तेंनी त्यांच्या भन्नाट स्टाईलने बलविलेला हा चित्रपट तरुणांना खास भावला. यातील, डायलॉबाजी, गाणी प्रेक्षकांना नक्कीच आवडली. त्यामुळेच आता या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिविहीजन प्रिमिअर होणार आहे. लवकरच कान्हा हा चित्रपट छोट्या पडदयावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आपल्या विविध चित्रपटांतून सामाजिक भान जपत मनोरंजक चित्रपट बनविणारा संगीतकार-दिग्दर्शक म्हणजे अवधूत गुप्ते. नुकताच प्रदर्शित झालेल्या त्यांच्या कान्हा या चित्रपटातूनही असाच वेगळा विषय मांडला गेला. दहीहंडी उत्सवाची सध्यस्थिती दर्शविणाºया कान्हा चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर रविवार १८ डिसेंबरला दुपारी १२.०० वा. व सायंकाळी ७.०० वा. झी टॉकीजवर होणार आहे. दहीहंडीचा थरार बघता अलीकडे हा उत्सव यात खेळणाºया मुलांच्या जीवावर बेतायला लागला आहे. यात सहभागी होणाºया मुलांची सुरक्षा महत्त्वाची की उत्सव महत्त्वाचा? पारंपारिक सणाचं स्वरूप योग्य की त्याला आलेलं इव्हेंटचं स्वरूप योग्य? अशा अनेक प्रश्नांवर ह्यकान्हाह्ण सिनेमात भाष्य करण्यात आलंय. दहीहंडी उत्सवातलं राजकारण व त्यात भरडले जाऊन एकमेकांसमोर उभे ठाकलेले मल्हार आणि रघू यांची गोष्ट कान्हा चित्रपटामधून बघायला मिळणार आहे. वैभव तत्ववादी, गश्मीर महाजनी, प्रसाद ओक, किरण करमरकर, गौरी नलावडे, सुमेध वाणी या कलाकारांच्या अभिनयाने आकारास आलेला कान्हा प्रेक्षकांना मनोरंजनासोबत विचार करायला प्रवृत्त करणारा आहे.

Web Title: Early Cannes visitor's meet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.