काय सांगता? अवघे १० मिनिटं अन् शरद केळकरने घडवली बाप्पाची ‘इको फ्रेंडली’ मुर्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 02:59 PM2021-09-04T14:59:34+5:302021-09-04T15:04:09+5:30
Sharad Kelkar: गणेशोत्सव हा सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकासाठीच खास असतो.
अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. त्यामुळे सध्या सगळीकडेच बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरु झाली आहे. विविध रंगांनी, फुलांनी बाजारपेठा सजून गेल्या आहेत. तर, प्रत्येक घरात या उत्सवाची तयारी सुरु झाली आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे आनंदाचं, मांगल्याचं आणि प्रसन्नतेचं वातावरण पसरलं आहे. गणेशोत्सव हा सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकासाठीच खास असतो. त्यामुळेच घराघरात या दिवसाची खास तयारी केली जाते. त्यातच लोकप्रिय अभिनेता शरद केळकरदेखील गणरायाच्या आगमनासाठी सज्ज झाला असून त्याने चक्क १० मिनिटांमध्ये गणेशाची इको फ्रेंडली मुर्ती घडवली आहे.
प्रत्येक गणेशोत्सवाच्या काळात शरद केळकरचा उत्साह पाहण्यासारखा असतो. अगदी सजावटीपासून ते बाप्पाच्या मुर्तीपर्यंत प्रत्येक गोष्टीकडे तो जातीने लक्ष घालत असतो. विशेष म्हणजे यंदा त्याचा हाच उत्साह द्विगुणित झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळेच अवघ्या १० मिनिटात त्याने बाप्पाची मुर्ती घडवली आहे. परंतु,
अवघ्या १० मिनिटात शरदने ही मुर्ती कशी घडवली हा प्रश्न अनेकांना पडला आहे.
प्रसिद्ध शिल्पकार आणि क्ले आर्टिस्ट शुभांकर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शरद केळकरने बाप्पाची ही इको-फ्रेंडली मुर्ती घडवली आहे. शुभांकर कांबळे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये याचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये शरद केळकर त्याच्या हाताने गणरायाची मुर्ती घडवताना दिसत आहे.