मकरंद अनासपुरे-सिद्धार्थ जाधवची पुन्हा धमाल कॉमेडी, 'एक डाव भुताचा' या तारखेला होणार रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 12:24 PM2024-08-30T12:24:10+5:302024-08-30T12:24:44+5:30

मकरंद अनासपुरे - सिद्धार्थ जाधवची धमाल कॉमेडी असलेल्या एक डाव भुताचा सिनेमाची घोषणा झाली (makrand anaspure, siddharth jadhav, ek dav bhutacha)

ek daav bhootacha movie starring Siddharth jadhav makrand anaspure | मकरंद अनासपुरे-सिद्धार्थ जाधवची पुन्हा धमाल कॉमेडी, 'एक डाव भुताचा' या तारखेला होणार रिलीज

मकरंद अनासपुरे-सिद्धार्थ जाधवची पुन्हा धमाल कॉमेडी, 'एक डाव भुताचा' या तारखेला होणार रिलीज

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रेक्षकांना खळखळून हसवणारी एव्हरग्रीन जोडी म्हणजे मकरंद अनासपूरे आणि सिद्धार्थ जाधव. मकरंद-सिद्धार्थ या जोडीने आजवर साडे माडे तीन, उलाढाल, दे धक्का २, शासन अशा सिनेमांमध्ये अभिनय केलाय. मकरंद-सिद्धार्थच्या जोडीचा सिनेमा म्हणजे पैसा वसूल एंटरटेनमेंट हे समीकरण ठरलेलं आहे. याच जोडीचा आता आणखी एक नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज आहे. त्याचं नाव 'एक डाव भुताचा'. या सिनेमाचं पोस्टर आज रिलीज झालं असून रिलीज डेटचीही घोषणा झालीय.

हे कलाकार मकरंद-सिद्धार्थसोबत झळकणार

भुतांच्या गोंधळाची आणि हास्याची विलक्षण कथा असणारा सिनेमा, अशी या चित्रपटाची टॅगलाईन असून 'एक डाव भुताचा' सिनेमाचं धमाल पोस्टर रिलीज झालंय.  रेवा इलेक्ट्रॉनिक्स या निर्मिती संस्थेने या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रस्तुती अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेन्मेंटेने केली आहे. या सिनेमाची कथा काय असणार याचा अंदाज टीझर, ट्रेलर आल्यावर कळून येईलच. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केलं आहे. चित्रपटात अभिनेते मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव यांच्यासोत नागेश भोसले,अक्षय कुलकर्णी,हर्षद नायबळ अभिनेत्री मयूरी देशमुख,अश्विनी कुलकर्णी, नंदिनी  वैद्य, वर्षा दांदळे यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.


या तारखेला रिलीज होणार सिनेमा

डॉ. सुधीर निकम आणि संदीप मनोहर नवरे यांनी 'एक डाव भुताचा'  सिनेमाचं पटकथा लेखन केलंय. तर डॉ. सुधीर निकम यांनी संवाद लेखन, गौरव पोंक्षे यांनी छायांकन, विक्रांत हिरनाईक यांनी गीतलेखन, गौरव चाटी यांनी संगीत दिग्दर्शन, प्रणव पटेल, मनु असाटी यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. सुप्रसिद्ध गायक सोनू निगम, अवधूत गुप्ते,रोहित राऊत आणि गायिका आनंदी जोशी यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत.  सिद्धार्थ जाधव आणि मकरंद अनासपूरे यांचा हा नवीन सिनेमा ४ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Web Title: ek daav bhootacha movie starring Siddharth jadhav makrand anaspure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.