सत्य घटनेला कल्पकतेची जोड म्हणजे फांदी सिनेमा - अजित साबळे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 11:26 AM2018-07-24T11:26:32+5:302018-07-24T11:27:34+5:30
यात नितीन बोढारे, अरुण नलावडे, भूषण घाडी, कुणाल विभूते (बालकलाकार), विशाल शिंदे, अमोल देसाई, यासारख्या कलाकारांनी भुमिका साकारल्या आहेत. २७ जुलै रोजी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.
‘फांदी’ नाव ऐकूनच जरा विचित्र वाटतं ना... सिनेमा पण असाच एका विषयावर आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे अजित साबळे यांनी. त्यांनी सत्य घटना आणि त्याला कल्पनेची जोड देत हा चित्रपट बनवला आहे. यात नितीन बोढारे, अरुण नलावडे, भूषण घाडी, कुणाल विभूते (बालकलाकार), विशाल शिंदे, अमोल देसाई, यासारख्या कलाकारांनी भुमिका साकारल्या आहेत. २७ जुलै रोजी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.
सिनेमाविषयी दिग्दर्शक अजित साबळे सांगतात की, “ही एका गावात घडलेली घटना आहे. माझ्या एका मित्राच्या आयुष्यात २००८ साली एक घटना घडली, तर त्या घटनेचा धागा पकडून आम्ही फांदी हा सिनेमा बनवला आहे. म्हणजेच काल्पनिक आणि सत्य घटना यांचे मिश्रण म्हणजेच ‘फांदी’ हा सिनेमा”.
दिग्दर्शनाबाबत साबळे म्हणाले की, “चौथीमध्ये असल्यापासूनच नाटक, लोकनाट्य अशा प्रकारे रंगभूमीशी निगडीत होतो. वयाच्या १०व्या वर्षापासूनच दिग्दर्शन करण्याचे मनाशी पक्कं केलं होतं. माझं एकंच ध्येय होतं की वयाच्या २४व्या वर्षी दिग्दर्शन करायचं, आणि त्या दिशेने माझा प्रवास चालू झाला आणि मग बऱ्याच एकांकिका, शॉर्ट फिल्म, काही रिअॅलिटी शो, हिंदी, मराठी सिनेमे केले, अश्याप्रकारे माझा दिग्दर्शनाचा प्रवास चालू झाला ते आता ‘फांदी’पर्यंत.”
फांदी सिनेमासाठी मुख्य भूमिकेत असलेल्या कुणाल आणि नितीन यांच्याविषयी बोलताना अजित यांनी सांगितले की, “कुणालची निवड त्यांनी एका शाळेत ते स्वतः मुख्य अतिथी म्हणून गेले असता तिथे त्यांना कुणाल दिसला, तो एका गाण्यावर नाचत असताना त्याच्या अॅक्शन इतरांपेक्षा वेगळ्या वाटल्या म्हणून ते बघूनच त्याची निवड झाली आणि नितीन ज्या भुमिकेसाठी या सिनेमामध्ये आहे त्या भुमिकेसाठी नितीनच बरोबर आहे हे माझ्या लक्षात आलं म्हणून त्याची निवड केली.” संवाद साधताना पुढे त्यांनी एक किस्सा सांगितला. तो म्हणजे शूट करताना एका गावात देवाची मिरवणूक जात होती आणि मिरवणुकीतच नितीन यांचा सीन शूट होणार होता. त्यासाठी एका मोठ्या हाराची गरज होती पण तो मिळाला नाही म्हणून त्या ग्रामस्थांना विनंती करून देवाचाच हार वापरला, आणि नंतर तो सीन शूट झाला. असे आणि अधिक किस्से घडले आणि या सिनेमाचे शूट पार पडले. तर असा हा सिनेमा 27 जुलै ला प्रदर्शित होणार आहे.