अशोक-निवेदिता सराफ महिलाश्रमासोबत साजरी करतात दिवाळी; अंध मुलींसाठीही करतात खास काम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 06:30 PM2023-11-10T18:30:53+5:302023-11-10T18:31:53+5:30
Ashok and Nivedita Saraf :
दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. त्यामुळे सगळीकडे या दिवसांत दिव्यांची रोषणाई पसरलेली असते. प्रत्येक घरात गोडाधोडाचे पदार्थ केले जातात. नातेवाईकांच्या भेटीगाठी घेतल्या जातात. कुटुंब एकत्र येऊन या दिवसात प्रचंड मज्जामस्ती करतात. अगदी सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकाच्या घरात हेच चित्र पाहायला मिळतं. परंतु, अभिनेता अशोक सराफ आणि निवेदिता सराफ ही जोडी मात्र एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी करतात.
अलिकडेच अभिनेत्री निवेदिता सराफ(Nivedita Saraf ) यांनी त्यांची दिवाळी कशी असते. त्या कशाप्रकारे साजरी करतात हे सांगितलं. यावेळी बोलत असताना त्या दरवर्षी महिलाश्रम आणि अंध मुलींसाठी आवर्जुन फराळ पाठवतात असं सांगितलं.
"आम्ही लहान असताना आई खाजाचे कानोले, लाडू चिवडा, बाळ फराळ असे स्वादिष्ट पदार्थ बनवत असे. लग्न झाल्यावर दिवाळीच्या वेळी सासरचे लोक माझ्या घरी येतात आणि आम्ही सगळे मिळून जेवतो. या वर्षी आम्ही आमच्या नातेवाईकांच्या घरी जाणार आहोत, तरीही मला हे सगळे दिवाळीचे पदार्थ बनवायला आवडतात. माझा मुलगा अनिकेत गेल्या काही वर्षांपासून दूर आहे आणि मुलांशिवाय सण साजरे करणे रिकामे वाटते. पण, आम्ही त्याच्यासोबत व्हिडिओ कॉल करतो आणि एकत्र दिवाळी फराळ करतो", असं निवेदिता सराफ यांनी सांगितलं.
पुढे त्या म्हणतात, "मी अनिकेतला दरवर्षी फराळ पाठवते. तसेच मी आणि अशोक (ashok saraf) आम्ही दोघे श्रद्धानंद महिला आश्रम आणि कुमुदबेन इंडस्ट्रियल होम फॉर ब्लाइंड मुलींना दिवाळीच्या फराळाचे वाटप देखील करतो. जे घरापासून दूर आहेत आणि एकटे साजरे करू शकत नाहीत त्यांना दिवाळीचा फराळ पुरवतो."
दरम्यान, निवेदिता आणि अशोक सराफ यांच्या या आगळ्या वेगळ्या दिवाळीविषयी फारसं कोणाचा ठावूक नव्हतं. त्यामुळे त्यांच्याविषयीची ही माहिती पहिल्यांदाच समोर आली आहे. सध्या निवेदिता सराफ 'भाग्य दिले तू मला' या मालिकेत रत्नमाला मोहिते ही भूमिका साकारत आहेत.