सात देशांमधील चित्रपटतज्ञ करणार पिफचे परिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2017 12:45 PM2017-01-04T12:45:43+5:302017-01-04T12:45:43+5:30

 पिफ महोत्सवात दाखविल्या जाणा-या चित्रपटांच्या परीक्षणासाठी जगातील निवडक चित्रपट तज्ज्ञांना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये अपर्णा सेन (भारत), प्रो. ...

Examination of piffa to filmmakers in seven countries | सात देशांमधील चित्रपटतज्ञ करणार पिफचे परिक्षण

सात देशांमधील चित्रपटतज्ञ करणार पिफचे परिक्षण

googlenewsNext
 
िफ महोत्सवात दाखविल्या जाणा-या चित्रपटांच्या परीक्षणासाठी जगातील निवडक चित्रपट तज्ज्ञांना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये अपर्णा सेन (भारत), प्रो. जेर्झी स्टर (पोलंड), गोरान पास्कलजेव्हिक (सर्बिया), जॉर्ज अरियागाडा (चिली), जेन्स फिशर (स्वीडन), गोवरी रामनारायण (भारत), बेनेट रत्नायके (श्रीलंका) आणि नर्गिस अबायर (इराण) यांचा समावेश आहे.

या निवड झालेल्या चित्रपटांबद्दल बोलताना डॉ. जब्बार पटेल म्हणाले की, पर्यावरण ही यावर्षीच्या महोत्सवाची संकल्पना असून यावर्षीच्या महोत्सवासाठी आमच्याकडे जगभरातील ९५ देशांमधून तब्बल अकराशे चित्रपटांनी आपला सहभाग नोंदविला होता. पैकी निवड समितीने २२५ अधिक चित्रपटांचा समावेश महोत्सावात करण्यात आला असून हे सारे चित्रपट या महोत्सावा दरम्यान चित्रपट रसिकांना पाहता येणार आहेत.

महोत्सवा दरम्यान फर्स्ट बॉर्न (चिली) या चित्रपटाचा इंटरनॅशनल प्रीमिअर तर व्हेअर ग्रो ओल्ड (ब्राझील/ पोर्तुगल), ल्युईस बाय दी शोअर (फ्रांस), लिटील माउंटन बॉय (स्वित्झरलॅण्ड) आणि देवभूमी (भारत) या चित्रपटांचा इंडीयन प्रीमिअर होणार असल्याचे डॉ. पटेल यांनी सांगितले.             
 
पिफ बझार बद्दल अधिक माहिती देताना श्रीरंग गोडबोले म्हणाले की, मागील वर्षी मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर याहीवर्षी आम्ही पिफ बझार अंतर्गत अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन करीत आहोत. ज्यामध्ये चित्रपट विषयाशी संबंधित कार्यशाळा, चर्चासत्रे, व्याख्याने यांचा समावेश असणार आहे. यावर्षी पिफ बझारच्या पॅव्हेलियनचे नामकरण हे दादासाहेब फाळके पॅव्हेलियन असे करण्यात आले असून यांद्वारे दादासाहेब फाळके यांना मानवंदना वाहण्यात येणार आहे. ज्यामध्ये त्यांच्यावरील चित्रप्रदर्शनी, हायलाईट्स, चित्रपट यांचा समावेश असणार आहे. पिफ बझार हे सर्वांसाठी खुले आणि विनामूल्य असणार असून त्याचा सर्व चित्रपट रसिकांनी लाभ घ्यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.

याशिवाय दिग्दर्शक, अभिनेते, लेखक व तंत्रज्ञ यांसाठी खास टेक्निकल लॅब कार्यशाळेचे आयोजन देखील करण्यात येणार आहे. ज्यामध्ये चित्रपटांशी संबंधित अनेक विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येईल.  

Web Title: Examination of piffa to filmmakers in seven countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.