Exclusive अशोक- राधिकाचा उला लवकरच प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2016 07:54 AM2016-07-28T07:54:39+5:302016-07-28T13:24:39+5:30

प्रियांका लोंढे              साऊथ मधील सुपरस्टार अशोक कुमार भट्टाचार्य त्याच्या अनोख्या स्टाईलमुळे साऊथ इंडस्ट्रीमध्ये ...

Exclusive Ashok - Radhika's release soon | Exclusive अशोक- राधिकाचा उला लवकरच प्रदर्शित

Exclusive अशोक- राधिकाचा उला लवकरच प्रदर्शित

googlenewsNext
n style="font-weight: 700;">प्रियांका लोंढे
             साऊथ मधील सुपरस्टार अशोक कुमार भट्टाचार्य त्याच्या अनोख्या स्टाईलमुळे साऊथ इंडस्ट्रीमध्ये चांगलाच फेमस आहे.  मराठी चित्रपटसृष्टीत नशीब आजमाविण्यासाठी आता अशोक डिस्को सन्या या चित्रपटातून पदार्पण करीत आहे. मुळचा महाराष्ट्रातील असलेला हा रांगडा हिरो साऊथ मधील चित्रपटांमध्ये झळकू लागला. डिस्को सन्या या चित्रपटानंतर अशोकचा राधिका आपटे सोबत उला नावाचा तामिळ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. याच चित्रपटाच्या संदर्भात सीएनएक्सने अशोक कुमार सोबत संवाद साधला असता त्याने या बातमीचा उलगडा केला.

                     

राधिका आपटे सोबत माझा उला नावाचा चित्रपट येणार आहे. या चित्रपटात मी लीड रोल मध्ये जरी असलो तरी याला थोडी निगेटिव्ह शेड आहे. उला चा अर्थ होतो जर्नी. आणि माझे कॅरेक्टर एका भुमिकेतून दुसºया भुमिकेत जाताना दाखविले आहे. माझ्या कॅरेक्टरच्या शेड्सचा हा अनोखा प्रवास यात दाखविण्यात आला आहे. राधिका सोबत काम करण्याचा अनुभव खुपच छान होता. चित्रपटाचे शुटिंग पुर्ण झाले असुन लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटिला येईल. एवढेच नाही तर आम्ही कबालीच्या रिलिजची उला प्रदर्शित करण्यासाठी वाट पाहत असल़्याचेही त्याने सांगितले. छान मराठी बोलणारा अशोक लवकरच डिस्को सन्या मध्ये आपल्याला ऐका विशेष भुमिकेमध्ये दिसणार आहे. तर उलाच्या प्रदर्शना नंतर साऊथचा हा हँडसम हंक लीड रोलमध्ये मराठी चित्रपटातही प्रेक्षकांना लवकरच दिसु शकतो. 

Web Title: Exclusive Ashok - Radhika's release soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.