Exclusive डबस्मॅशमुळे मिळाला ईशानला बॅन्जो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2016 08:02 AM2016-09-22T08:02:57+5:302016-09-22T13:32:57+5:30

  प्रियांका लोंढे                          चित्रपटसृष्टीच्या झगमगाटाची भूरळ लाखो-करोडो ...

Exclusive dubcash was found in Ishan, Banjo | Exclusive डबस्मॅशमुळे मिळाला ईशानला बॅन्जो

Exclusive डबस्मॅशमुळे मिळाला ईशानला बॅन्जो

googlenewsNext
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small;">  प्रियांका लोंढे
       
                 चित्रपटसृष्टीच्या झगमगाटाची भूरळ लाखो-करोडो तरूणांना पडलेली असते. या स्वप्ननगरीत आपले नशीब आजमाविण्यासाठी कितीतरी जण दर दिवशी या चंदेरी दुनियेत येत असतात. पण म्हणतात ना तकदीर के आगे कुछ नही चलता, तसेच काही झाले आहे ईशान खोपकर या चिमुकल्या सोबत. ईशानला थेट चित्रपट मिळाला तो पण बॉलिवूडचा. रितेश देशमुखच्या बॅन्जो या चित्रपटाची चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये चांगलीच रंगू लागली आहे. आणि या चित्रपटामध्ये आपल्याला निर्माते अमेय खोपकर यांचा मुलगा ईशानचा अभिनय पाहायला मिळणार आहे. खरी गंमत तर पुढे आहे, ईशानला हा चित्रपट मिळाला पण तो काही आॅडिशन देऊन नाही. तर दिग्दर्शक रवी जाधव यांनी फेसबुकवर ईशानचे काही डबस्मॅश पाहिले होते. आणि ते डबस्मॅश त्यांना एवढे भावले की दिग्दर्शकांनी लगेचच ईशानच्या वडिलांना फोन लावला आणि ईशानला बॅन्जो या चित्रपटात घ्यायची इच्छा असल्याचे सांगितले. मग ईशानला याविषयी विचारण्यात आले, अभ्यास सांभाळून जर तु करू शकत असशील तर नक्कीच कर असे त्याला सांगण्यात आले. ईशानलाही चित्रपटात काम करायचे होते मग त्याने लगेचच होकार दिला. शाळा आणि अभ्यास सांभाळत मग बॅन्जोच्या शूटिंगला सुरुवात झाली. एवढेच नाही तर दस्तुरखुद्द बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील ईशानला त्याच्या बॅन्जो या चित्रपटातील अभिनयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. चित्रपटसृष्टीत ईशानने पहिले पाऊल टाकले आहे त्याला चांगले यश मिळो आणि तो खुप पुढे जावो अशी सदिच्छा बिग बी यांनी व्यक्त केली आहे. खरंय म्हणा, यालाच म्हणतात नशीब बदलायला वेळ लागत नाही.
 

Web Title: Exclusive dubcash was found in Ishan, Banjo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.