Hardeek Joshi : लग्न उरकलं, देवदर्शन झालं, पण ‘राणादा’ला एकाच गोष्टीची खंत...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 11:32 AM2022-12-20T11:32:50+5:302022-12-20T11:35:03+5:30

 Hardeek Joshi, Akshaya Deodhar : लग्नानंतर हार्दिकने एक खंत व्यक्त केली आहे. होय, ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत हार्दिकने ही खंत बोलून दाखवली.

EXCLUSIVE Hardeek Joshi TALK On Honeymoon Destination & Special Year 2022 | Hardeek Joshi : लग्न उरकलं, देवदर्शन झालं, पण ‘राणादा’ला एकाच गोष्टीची खंत...

Hardeek Joshi : लग्न उरकलं, देवदर्शन झालं, पण ‘राणादा’ला एकाच गोष्टीची खंत...

googlenewsNext

तुमचा आमचा लाडका राणादा अर्थात अभिनेता हार्दिक जोशी ( Hardeek Joshi) आणि लाडकी पाठकबाई अर्थात अक्षया देवधर ( Akshaya Deodhar) नुकतेच लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर दोघांनीही नाशिकला जात सप्तश्रृंगी देवीचं दर्शन घेतलं. पण लग्नानंतर आता हार्दिकने एक खंत व्यक्त केली. होय, ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत हार्दिकने ही खंत बोलून दाखवली.

मी तिला का फिरायला घेऊन जात नाही?
लग्न झालंय, देवदर्शन आटोपलंय... अशात फिरायला जायचा काही प्लान? असा प्रश्न हार्दिकला यावेळी करण्यात आला. यावर तो म्हणाला, ‘  मी तिला का फिरायला घेऊन जात नाही? अशी मला एक खंत राहिली आहे. मी माझ्या कामामधून वेळ काढणार आहे आणि तिला घेऊन जाणार आहे. मी काम करत होतो आणि अक्षया एकटी सगळं लग्नाचं सगळं मॅनेज करत होती.  त्यामुळे लवकरच तिला कुठेतरी फिरायला घेऊन जाईन. मी तिला घेऊन जाण्यापेक्षा मी तिला विचारेन की तुला कुठे फिरायला जायचं आहे. जिथे कुठे जाण्याचं तिचं स्वप्न असेल तिथे मी तिला घेऊन जाईन.’

2022 हे वर्ष तुझ्यासाठी कसं होतं..?
 2021-22 या वर्षात सिनेमा काय असतो हे मी शिकलो. त्यामुळे मला नवे सिनेमे मिळत गेले. सिनेमा मला पूर्ण समजला आहे, असं मी म्हणणार नाही. पण कुठेतरी सिनेमा मला कळायला लागला आहे आणि मी त्या पद्तीने अभ्यास करायला लागलो आहे. या वर्षाने मला खूप काही श्किवलं. या वर्षात माझं लग्न झालं, ही सुद्धा यावर्षाची एक उपलब्धी आहे, असंही तो म्हणाला.

Web Title: EXCLUSIVE Hardeek Joshi TALK On Honeymoon Destination & Special Year 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.