Exclusive : आता अभिनय बेर्डे झळकणार अशी ही आशिकी या चित्रपटात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2017 10:55 AM2017-08-17T10:55:05+5:302017-08-18T10:11:29+5:30
ती सध्या काय करते या चित्रपटाद्वारे अभिनय बेर्डेने मराठी चित्रपटसृष्टीत एंट्री केली. दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा तो मुलगा ...
त सध्या काय करते या चित्रपटाद्वारे अभिनय बेर्डेने मराठी चित्रपटसृष्टीत एंट्री केली. दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा तो मुलगा असल्याने त्याच्या पदार्पणापूर्वीच त्याच्या नावाची चर्चा झाली होती. त्याच्याकडून प्रेक्षकांच्या खूप साऱ्या अपेक्षा होत्या. ती सध्या काय करते या चित्रपटाद्वारे त्याने तो एक चांगला अभिनेता असल्याचे सिद्ध केले आहे आणि आता तो पुन्हा एकदा एका चित्रपटात झळकणार असल्याची चर्चा आहे.
सचिन पिळगांवकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध जोडी होती. सचिन पिळगांवकर यांच्या अनेक चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना लक्ष्मीकांत यांना पाहायला मिळाले होते. अशी ही बनवाबनवी, आयत्या घरात घरोबा यांसारख्या चित्रपटांमध्ये त्या दोघांनी एकत्र काम देखील केले होते. सचिन यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक चित्रपटांमध्ये लक्ष्मीकांत यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. आता सचिन लक्ष्मीकांत यांच्या मुलासोबत काम करणार आहे.
अभिनय बेर्डे लवकरच अशी ही आशिकी या चित्रपटात झळकणार असून या चित्रपटाची निर्मिती सचिन पिळगांवकर करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. सचिन पिळगांवकर यांच्या या चित्रपटात प्रेक्षकांना एक लव्ह स्टोरी पाहायला मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. अभिनयसोबत या चित्रपटात प्रमुख भूमिका कोण साकारणार हे अद्याप तरी ठरलेले नाही. अभिनयसोबत काम करण्यासाठी एका चांगल्या अभिनेत्रीचा शोध घेतला जात असल्याचे कळतेय.
अभिनयने ती सध्या काय करते या त्याच्या पहिल्याच चित्रपटाद्वारे चांगलेच फॅन फॉलॉविंग मिळवले आहे. त्यामुळे तो आता कोणत्या चित्रपटात झळकणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली आहे. अभिनयच्या फॅन्ससाठी ही नक्कीच चांगली बातमी आहे.
Also Read : अभिनय बेर्डे म्हणतो, आज बाबांचा सल्ला मिळाला असता तर खूप छान वाटलं असतं