Exclusive सिद्धार्थ-स्पृहा गारठले पावसात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2016 01:04 PM2016-07-19T13:04:27+5:302016-07-19T18:34:27+5:30

         प्रियांका लोंढे                          बेधुंद बरसणाºया ...

Exclusive Siddhartha - Sprouty rainy rain | Exclusive सिद्धार्थ-स्पृहा गारठले पावसात

Exclusive सिद्धार्थ-स्पृहा गारठले पावसात

googlenewsNext

/>         प्रियांका लोंढे
           
             बेधुंद बरसणाºया पावसाच्या सरींमध्ये स्वत:ला ओलेचिंब करुन घेत  पावसात भिजण्याची मजाच काही और असते. सिनेमांमध्ये तर अनेकदा आपण  पावसात गाण्यांच्या तालावर थिरकणारे हिरो-हिरोईन पाहतोच.  परंतू पडद्यावर दिसणाºया त्या खोट्या खोट्या पावसात या हिरो-हिरोईनला स्वत:च्या आनंदासाठी नाही तर केवळ त्या सीन्स साठी नाईलाजास्तव भिजावे लागते. आता पहा ना लॉस्ट अ‍ॅन्ड फाऊंड या आगामी चित्रपटातील हॅन्डसम हंक सिद्धार्थ चांदेकर अन स्पृहा जोशी यां दोघांनाही असाच काही पावसातील मजेशीर अनुभव या चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान आला. हा फनी इन्सिडन्स सिद्धार्थने सीएनएक्ससोबत शेअर करताना सांगितले की, आम्हाला पावसातील दोन वेगवेगळे सीन्स एकाच दिवशी शुट करायचे होते म्हणुन आम्ही रेन मशिन मागवले होते. परंतू काही तांत्रिक कारणास्तव ते मशिन येऊ शकल नाही. मग काय करायच हा प्रश्न सर्वांसमोरच पडला अन आमच्या युनिटने परमिशन घेऊन एक पाण्याचा टँकर मागविला. एवढेच नाही तर छोटे-छोटे शॉवर, पाईप्स या सर्व गोष्टी सेटवर आल्या. त्यानंतर मला अन स्पृहाला भिजविण्यात आले. या सर्व गोष्टींसाठी संध्याकाळ झाली. खुप थंडी वाजत होती अन अशा अवस्थेत आम्ही दोघे पार भिजुन गारठलो होतो. ते पाणी पण एवढे गार होते की अक्षरश: आम्ही दोघहीे कुडकुडतच होतो. पण जेव्हा तुम्ही हे सीन्स पहाल तेव्हा ते खरच एकदम सुंदर अन नॅचरल वाटतील. नक्कीच  पावसातील हे रोमँटिक सीन्स पाहण्यासाठी सिद्धार्थचे चाहते लॉस्ट अ‍ॅन्ड फाऊंड या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतील यात मात्र काही शंकाच नाही. 

Web Title: Exclusive Siddhartha - Sprouty rainy rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.