Exclusive - प्राजक्ताचे कोणते स्वप्न झाले पूर्ण ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2016 06:40 PM2016-10-26T18:40:19+5:302016-10-27T13:23:38+5:30

आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येकजण पैशाच्या मागे पळत असते. त्यामुळे बरेच वेळा आपण शिक्षणात घेतलेली पदवी आणि नोकरी याचा संबंध ...

Exclusive - Which dream of Prajakta was completed? | Exclusive - प्राजक्ताचे कोणते स्वप्न झाले पूर्ण ?

Exclusive - प्राजक्ताचे कोणते स्वप्न झाले पूर्ण ?

googlenewsNext
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येकजण पैशाच्या मागे पळत असते. त्यामुळे बरेच वेळा आपण शिक्षणात घेतलेली पदवी आणि नोकरी याचा संबंध नसतो. पण जर समजा तुम्हाला तुमच्या आवडत्या फिल्डमध्येच नोकरी करायला मिळाली तर त्याचा आनंद काही वेगळाच असतो. असेच काहीस झालेय अभिनेत्री प्राजक्ता माळीसोबत.

प्राजक्ताने भरतनाटयममधून विशारद ही पदवी मिळवली आहे. त्यामुळे साहजिकच तिला भरतनाटय करण्याची संधी मिळावी असे तिचे स्वप्न होते. अखेर तिचे हे स्वप्न पूर्ण झाल्याचे तिने नुकतेच लोकमत सीएनएक्सला सांगितले आहे.

आपल्या या स्वप्नाविषयी प्राजक्ता सांगते, ''माझे हे स्वप्न वारसदार या चित्रपटाच्या माध्यमातून पूर्ण झाल्याने मी खूप आनंदी आहे. या चित्रपटात मी गणेशवंदना या गाण्यावर नृत्य करणार आहे. हे नृत्य बॉलिवुडचे तगडे कोरिओग्राफर गणेश आचार्या यांनी बसविले आहे. त्यामुळे माझा आनंद म्हणजे सोने पे सुहागा म्हणण्यास हरकत नाही.''

तसेच या गाण्यात प्रेक्षकांना तांडवदेखील करताना मी पाहायला मिळणार आहे.  बॉलिवूडचा हा कोरिओग्राफर खरेच खूप डाउन अर्थ आहे. तो सेटवर सगळयांशीच मराठीमध्येच संवाद साधत होते. त्यामुळे  त्यांच्याकडून नृत्याचे धडे घेताना कधी जाणविले ही नाही की, ते बॉलिवूडचे कोरिओग्राफर आहेत. तसेच ते कामाच्या बाबतीत देखील अधिक प्रोफेशनल आहे. छोटया गोष्टींवरदेखील ते खूप मेहनत करून घेत असतात. असे आयुष्यातील दोन महत्वाचे प्रसंग एकाच चित्रपटाच्या माध्यमातून घडत असल्यामुळे आज मैं उपर, आसमा नीचे...असेच म्हणावे वाटते.

             prajkta mali

यापूर्वी प्राजक्ताने जुळून येतील रेशीमगाठी या मालिकेतून भरभरून प्रेक्षकांचे प्रेम मिळविले आहे. तसेच तिने सुवासिनी, बंध रेशमाचे, सुगरण, गाणे तुमचे आमचे अशा अनेक मालिकेतून देखील पाहायला मिळाली. तसेच तिने खो-खो, संघर्ष, गोळाबेरीज असे चित्रपटदेखील केले आहे.

Web Title: Exclusive - Which dream of Prajakta was completed?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.