Exculsive - संतोष कोणाला म्हणतोय ए ?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2016 07:03 PM2016-11-04T19:03:16+5:302016-11-04T19:03:16+5:30

    बेनझीर जमादार संतोष जुवेकर हा लवकरच प्रेक्षकांना एका आगामी सिनेमात पाहायला मिळणार आहे. त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव ...

Exculsive - Does anyone say Santosh? | Exculsive - संतोष कोणाला म्हणतोय ए ?

Exculsive - संतोष कोणाला म्हणतोय ए ?

googlenewsNext
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">    बेनझीर जमादार

संतोष जुवेकर हा लवकरच प्रेक्षकांना एका आगामी सिनेमात पाहायला मिळणार आहे. त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव 'ए' असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल देऊळकर यांनी केले आहे. या चित्रपटाविषयी लोकमत सीएनएक्सला सांगतो, ए हा चित्रपट शाळेतील लहान मुलांच्या जीवनावर आधारित असणार आहे. हल्ली शाळेतील मुलांना शिक्षण आणि शिस्तीमध्ये राहावे लागते. यामुळे मुलांमध्ये एक भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. तसेच मुलांचे बालपणदेखील हरवत चालले असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या मुलांना प्रेम आणि आपुलकीची गरज असते. अशा या मुलांची बाजू मांडणारा शिक्षकांची भूमिका मी करणार आहे. एक कलाकार म्हणून अशा विविध भूमिका करायला मला फार आवडतात. या भूमिका मला साकार करायला मिळतात हे माझे भाग्य आहे. संतोष सध्या अस्सं सासर सुरेख बाई या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. तसेच यापूर्वी संतोषने झेंडा, एक तारा, फक्त लढ म्हणा, शर्यत, मोरया,रेगे, सुख म्हणजे नक्की काय असते अशा अनेक चित्रपटातून झळकला होता. त्यामुळे संतोषच्या ए या आगामी चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. ए या चित्रपटाचे निर्माते राजेंद्र शिंदे असून, सादरकर्ते अवधूत गुप्ते असणार आहेत. तसेच या चित्रपटात शर्वरी जेमनीस, भाऊ कदम, शिल्पा तुळसकर, वैभव मांगले, पार्थ भालेराव या कलाकारांचा समावेश असणार आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण सध्या चालू आहे. मात्र अशा या तगडया कलाकारांचा चित्रपट हा प्रेक्षकांसाठी नक्कीच खास असणार आहे. तसेच संतोषची हटके भूमिकादेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल अशी आशा करूयात. 

Web Title: Exculsive - Does anyone say Santosh?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.