Exculsive - अमेयची पहिली हिंदी वेबसीरिज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2016 04:51 PM2016-11-02T16:51:34+5:302016-11-02T16:51:34+5:30

   बेनझीर जमादार प्रेक्षकांचा लाडका अभिनेता अमेय वाघ हा लवकरच एका वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. या वेबसीरिजमध्ये हिंदी आणि इंग्लिश ...

Exculsive - The first Hindi webcage in Ameya | Exculsive - अमेयची पहिली हिंदी वेबसीरिज

Exculsive - अमेयची पहिली हिंदी वेबसीरिज

googlenewsNext
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">   बेनझीर जमादार

प्रेक्षकांचा लाडका अभिनेता अमेय वाघ हा लवकरच एका वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. या वेबसीरिजमध्ये हिंदी आणि इंग्लिश भाषेचे मिश्रण असणार आहे. या वेबसीरिजचे नाव बॉयगिरी असे आहे. अमेयची ही पहिली हिंदी वेबसीरिज असणार आहे. या वेबसीरिजविषयी लोकमत सीएनएक्सला अमेय सांगतो, खरेच माझ्यासाठी हिंदी वेबसीरिजच करणे हा वेगळा अनुभव असणार आहे. सध्या या वेबसीरिजचे चित्रिकरण चालू आहे.  या वेबसीरिजमध्ये प्रेक्षकांना इंग्लिश थिएटर करणारे कलाकारदेखील पाहायला मिळणार आहे. याआधी मी ही इंग्लिश थिएटर केले असल्याने माझी या कलाकारांसोबत आधीपासूनच ओळख होती त्यामुळे एकत्र करताना मजा आली. तसेच हिंदी वेबसीरिजच्या प्रेक्षकांविषयी सांगायचे तर, यापूर्वी मी कास्टिंग काऊच ही वेबसीरिज केली आहे. या वेबसीरिजमध्ये राधिका आपटे, महेश मांजरेकर, श्रिया पिळगांवकर, सई ताम्हणकर या बॉलिवूड कलाकारांनी देखील हजेरी लावली होती. त्यामुळे अमराठी प्रेक्षकसुद्धा ही वेबसीरिज पाहात होते. त्यामुळे मराठी आणि अमराठी अशा माझ्या दोन्ही प्रेक्षकांसाठी ही हिंदी आणि इंग्लिश अशी मिश्रण भाषा असणारी वेबसीरीज असणार आहे. अदयाप या वेबसीरिजचे बॉयगिरी हे नाव तात्पुरते असल्याचे देखील अमेयने सांगितले आहे. यापूर्वी अमेय दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. नुकताच घंटा हा चित्रपटदेखील प्रदर्शित झाला आहे. आता अमेय महेश मांजरेकर यांच्या चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यामुळे सध्या अमेयची गाडी सुसाट निघाली असल्याचे पाहायला मिळत आहे. 

Web Title: Exculsive - The first Hindi webcage in Ameya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.