Exculsive - चिरागची भूमिका ही वजनदार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2016 07:52 PM2016-11-04T19:52:59+5:302016-11-04T19:52:59+5:30
बेनझीर जमादार क्रिकेट क्षेत्रात आपल्या खेळाने संदीप पाटील यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी भारतीय ...
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;"> बेनझीर जमादार
क्रिकेट क्षेत्रात आपल्या खेळाने संदीप पाटील यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी भारतीय क्रिकेट टीमच्या प्रशिक्षकाची जबाबदारीही पार पाडली. क्रिकेटचं मैदान गाजवलेल्या क्रिकेटरचा मुलगाही आता चित्रपटसृष्टी गाजवायला सज्ज झाला आहे. चिराग पाटील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास सज्ज झाला आहे. लवकरच चिरागचा वजनदार हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याच चित्रपटाविषयी चिरागने लोकमत सीएनएक्सशी साधलेला मनमोकळा संवाद.
क्रिकेट क्षेत्रात आपल्या खेळाने संदीप पाटील यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी भारतीय क्रिकेट टीमच्या प्रशिक्षकाची जबाबदारीही पार पाडली. क्रिकेटचं मैदान गाजवलेल्या क्रिकेटरचा मुलगाही आता चित्रपटसृष्टी गाजवायला सज्ज झाला आहे. चिराग पाटील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास सज्ज झाला आहे. लवकरच चिरागचा वजनदार हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याच चित्रपटाविषयी चिरागने लोकमत सीएनएक्सशी साधलेला मनमोकळा संवाद.
१. या चित्रपटातील तुझ्या भूमिकेविषयी सांग?
- या चित्रपटात मी ओंकारच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये मी सई ताम्हणकरच्या पतीची भूमिका साकारत असून तो एका बिझनेसमॅनचा मुलगा असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्याचे कुटुंबीय नियमांवर आणि तत्वांवर चालणारे असते. अशा या कुटुंबामध्ये सईचे जेव्हा आगमन होते तेव्हा ही कशी ती तत्त्व सांभाळते यांची गंमत या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
२. या चित्रपटातील दिग्दर्शकासहित तगडया कलाकारांसोबतचा काम करण्याचा अनुभव कसा होता?
- या सर्व तगडया कलाकारांचा विचार करून मला वाटले की, या चित्रपटाच्या सेटवर माझे खूप अवघड असणार आहे. मात्र दिग्दर्शक सचिन यांना भेटून माझी ही भीती पूर्णपणे दूर झाली होती. त्याचप्रमाणे सई ही माझी जुनी मैत्रिण असल्यामुळे तिच्यासोबतचे बाँन्डिंग आधीपासून चांगले होते. प्रिया आणि सिध्दार्थ हे दोघेही देखील खूप मन मिळावू असल्यामुळे त्यांच्याशी ही माझे लगेच जमले. तसेच वजनदारच्या या तगडया टीमने मला कधी ही जाणवून दिले नाही की, मी या इंडस्ट्रीत नवा आहे.
३. वडील संदीप पाटील हे क्रिकेट क्षेत्रात असताना तू अभिनय या क्षेत्राची निवड का केलीस?
- मला लहानपणापासून अभिनयाची आवड होती. आई आणि बाबांनीदेखील करिअर निवडण्याबाबत स्वातंत्र दिले आहे. त्यांनी सुरुवातपासून मला माझ्या आवडत्या क्षेत्रात करिअर कर असेच सांगितले होते. तू जे करशील त्यासाठी आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत असे सांगितले. खूप कमी लोक असतात ज्यांना आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळते. त्यांच्यापैकी मी एक असल्याचा मला आनंद आहे.
४. पडदयावरील तुझे वडील फार तत्वांवर चालणारे आहेत, पण रिअल लाइफमधील तुझे बाबा कसे आहेत?
रिअल लाइफमधले माझे बाब खूप फ्रेंडली आहेत. माझे आजोबा, बाबा हे दोघे क्रीडा या क्षेत्रात होते. त्यामुळे लहानपणांपासून आमच्या घरात शिस्तीचे वातावरण आहे. या शिस्तीची आम्हाला चांगचील सवय लागली आहे. मात्र मी, बाबा आणि माझा लहान भाऊ मिळून मस्तीसुद्धा करतो. तिघे मिळून आईला खूप त्रास देतो.
५. काही चित्रपटांच्या अपयशानंतर ही तुझा आत्मविश्वास आजही तेवढाच आहे याबद्दल काय सांगशील ?
- सगळ्यांनाच करिअरच्या सुरुवतीलाच यश मिळतेच असे नाही. काहीजणांना यश लवकर मिळते तर काहींना तो मिळायला थोडा वेळ लागतो. अपयश आल्यावर खचून नाही गेले पाहिजे. अपयश आल्याने ती गोष्ट सोडून त्या गोष्टीचा सातत्याने पाठपुरावा केला पाहिजे. कारण शेवटी भगवान के घर मे, देर है अंधेर नही.
६. असे म्हणतात की, सेलिब्रिटींच्या मुलांना जास्त स्ट्रगल करावे लागत नाही?
- मी तर म्हणेल, उलट सेलिब्रिटींच्या मुलांना जास्त मेहनत करावी लागते. कारण मी देखील प्रत्येक चित्रपटासाठी ऑडिशन दिले आहे. फक्त सेलिब्रिटींचा मुले असून चालत नाही. तर त्यासाठी तुमच्यात टॅलेंटदेखील असणे महत्वाचे आहे. कोणत्याही क्षेत्रात मेहनतीशिवाय पयार्य नसतो. मेहनत करा, यश मिळवा असाच माझ्या करिअरचा फंडा आहे.
७. मालिका, मराठी आणि बॉलिवूड चित्रपट याविषयी तुझे मत काय आहे?
- छोटा आणि मोठा पडदा असे काही मी मानत नाही. चांगली स्क्रिप्ट आणि भूमिका असेल तर मालिकादेखील पुन्हा करण्यास मी तयार आहे. त्यामध्ये मला कोणताही कमीपणा असा मला वाटत नाही. तसेच बॉलिवूडचा म्हणाल तर, मराठी इंडस्ट्रीच सध्या इतकी पुढे गेली आहे की, बॉलिवूड चित्रपट करावेसे वाटत नाही.