Exclusive बाप्पाच्या मिरवणूकीत तेजस्वीनीची शूटिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2016 08:27 AM2016-09-03T08:27:25+5:302016-09-03T13:57:25+5:30
प्रियांका लोंढे गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल खरतर ढोल-ताशांच्या गजरानेच आपल्याला ...
class="adn ads" style="padding-bottom: 20px; border-left: 1px solid transparent; padding-left: 4px; color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: medium; line-height: normal;">
प्रियांका लोंढे
गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल खरतर ढोल-ताशांच्या गजरानेच आपल्याला लागते. दहा दिवसांच्या या मंगलमय उत्साहात सर्वजणच आनंदाने सहभागी झालेले असतात. गणेशोत्सवातील प्रमुख आकर्षण म्हणजे बाप्पाच्या विसर्जण मिरवणूकूतील धमाल मस्ती. पुणे-मुंबई सारख्या शहरांमध्ये मोठ-मोठाल्या विसर्जन मिरवणूका यावेळी आपल्याला दिसतात. जगभरातून हा जल्लोष पाहण्यासाठी लोक बाप्पाच्या मिरवणूकांमध्ये सामील होतात. अनेक चित्रपटांमध्ये देखील आपण गणेशाची मिरवणूक पाहिली आहे.
सिनेसृष्टीला आणि कलाकारांनादेखील या मिरवणूकांची भूरळ पडलेली असून आपल्याला अनेक कलाकार ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूकांमध्ये थिरकताना दिसतात. आता असेच काही करणार आहे अभिनेत्री तेजस्वीनी पंडित. तुम्ही म्हणाल की तेजस्वीनी बाप्पाच्या मिरवणून नक्की काय करणार आहे. तर ही पठ्ठी यावेळी एका चित्रपटाचे शूटिंग गणेश विसर्जन मिरवणूकीत करणार आहे. याबाबत तेजस्वीनी सीएनएक्सला दिलेल्या मुलाखतीत सांगते, मला गणपती विसर्जन मिरवणूकीत ढोल वाजवायला फार आवडते. गेल्या तीन ते चार वर्षांपासून मी ढोल वाजवित आहे. परंतू यावेळी मला वादन करायला मिळाणार नाही. कारण गणेश विसर्जन मिरवणूकीत मी एका आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करणार आहे. आणि यातून मला वेळ मिळालाच तर मी नक्कीच ढोल वाजविण्याची मजा लुटणार आहे. लाईव्ह मिरवणूकीत केलेल्या चित्रीकरणामध्ये वेगळीच मजा असते.
प्रेक्षकांना पडद्यावर ते सीन्स पाहतानाही भव्यदिव्य वाटतात. चला तर मग तयार राहा तेजस्वीनीच्या चित्रपटातील बाप्पाच्या मिरवणूकीला चित्रपटात पाहण्यासाठी.