या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला करायचंय हॉलिवूडमध्ये काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 13:49 IST2019-04-05T13:49:09+5:302019-04-05T13:49:53+5:30
सिनेमासोबतच आपल्या हॉट आणि बोल्ड लूकमुळेही ती कायम चर्चेत असते. या अभिनेत्रीला आता हॉलिवूडमध्ये काम करायचे आहे.

या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला करायचंय हॉलिवूडमध्ये काम
'पप्पी दे पारुला' म्हणत सर्वांना आपल्या तालावर अभिनेत्री स्मिता गोंदकरने थिरकायला लावले. विविध चित्रपटातून वेगवेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. तसेच बिग बॉस मराठी या रिएलिटी शोमधून ती लोकप्रिय झाली. इतकेच नाही तर हॉट व बोल्ड फोटोजमुळे ती सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. तिला नेहमी वेगवेगळ्या भूमिका व गोष्टी करायला आवडतात.
नुकतेच तिने एका मुलाखतीत हॉ़लिवूडमध्ये काम करण्याचे स्वप्न असल्याचे सांगितले.
स्मिता गोंदकरने नुकतीच टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत हॉलिवूडमध्ये काम करायचे असल्याचे सांगितले व पुढे म्हणाली की,' कलाकारांनी कधीच स्वतःला सीमित ठेवले नाही पाहिजे. कलाकारांनी स्वतःमध्ये बदल करत नवनवीन गोष्टी करायला पाहिजेत. माझे तर हॉलिवूडमध्ये काम करायचे स्वप्न आहे. हे माझे खूप आधीपासूनचे स्वप्न आहे आणि लवकरच मी खूप मेहनत करून आणि प्रामाणिकपणे काम करून हे स्वप्न सत्यात पूर्ण करणार आहे. '
मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार खूप टॅलेटेंड आहेत ते तर कुठेही आपली कमाल दाखवू शकतात, असे मत स्मिताने व्यक्त केले.
स्मिता गोंदकर सोशल मीडियावर सक्रीय असून नेहमी ती तिच्या प्रोजेक्टबद्दल अपडेट देत असते. तसेच इंस्टाग्रामवर तिच्या चाहत्यांना तिचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतो. नुकतेच तिने एक फोटोशूट केले ज्यात ती ग्लॅमरससोबत रॉकिंग दिसते आहे.