"माझं तुझ्यावर क्रश आहे, पण नवऱ्यावर...", गश्मीरला चाहतीने केलं प्रपोज; अभिनेता म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 10:00 IST2024-02-15T09:58:39+5:302024-02-15T10:00:41+5:30
गश्मीर अधूनमधून इन्स्टाग्रामवर ask gashmeer सेशन घेत असतो. नुकतंच त्याने हे सेशन घेत चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली.

"माझं तुझ्यावर क्रश आहे, पण नवऱ्यावर...", गश्मीरला चाहतीने केलं प्रपोज; अभिनेता म्हणाला...
गश्मीर महाजनी हा मराठी सिनेसृष्टीतील हँडसम हंक आहे. अभिनयाच्या जोरावर त्याने मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत जम बसवला. वडील सुप्रसिद्ध स्टार असूनही गश्मीरने स्वत:च्या बळावर सिनेइंडस्ट्रीत स्थान निर्माण केलं. फिटनेस फ्रिक असलेला गश्मीर सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टची माहिती तो चाहत्यांना देतो. याबरोबरच ask gashmeer या सेशनमधून तो चाहत्यांशी संवादही साधतो.
गश्मीर अधूनमधून इन्स्टाग्रामवर ask gashmeer सेशन घेत असतो. नुकतंच त्याने हे सेशन घेत चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली. व्हॅलेंटाइन्स डेच्या दिवशी गश्मीरने हे सेशन घेतलं. या सेशनमध्ये नवीन प्रोजेक्टपासून ते कुटुंबापर्यंत चाहत्यांनी गश्मीरला प्रश्न विचारले. पण, एका चाहतीने थेट गश्मीरला प्रपोजच केलं. "क्रश आहे तुझ्यावर...पण प्रेम नवऱ्यावर आहे. तरीपण हॅपी व्हॅलेंटाइन डे", असं म्हणत चाहतीने तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या.
पण, चाहतीचं हे प्रपोजल ऐकून मात्र गश्मीरला हसू फुटलं. या चाहतीच्या प्रश्नाला उत्तर देत गश्मीरने तिला व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा दिल्या. याबरोबरच त्याने हसण्याचे इमोजीही शेअर केले. गश्मीरची ही पोस्ट व्हायरल झाली आहे.
गश्मीरने 'देऊळ बंद', 'सरसेनापती हंबीरराव', 'धर्मवीर', 'कॅरी ऑन मराठा', 'बोनस' अशा अनेक मराठी सिनेमांत काम केलं आहे. 'ईमली', 'तेरे इश्क मे घायल' या हिंदी मालिकांमध्येही गश्मीर झळकला. त्याने वेब सीरिजमध्येही काम केलं आहे.