कलेवरच्या निष्ठेने ‘दिग्दर्शनाचे’ स्वप्न साकार,‘फांदी’ द्वारे अजित साबळेंचे दिग्दर्शकीय पदार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 04:25 PM2018-07-23T16:25:22+5:302018-07-23T16:27:20+5:30

काहीजण स्वत:च्या फायद्यासाठी अंधश्रद्धेचं जाळं कशाप्रकारे पसरवतात हे दाखवतानाच एका कुटुबांची राजकीय नेते आणि समाजव्यवस्थेकडून केली जाणरी फसवणूक हा चित्रपट मांडतो.

Fandi Ajit Sabale's directorial debut by In Marathi | कलेवरच्या निष्ठेने ‘दिग्दर्शनाचे’ स्वप्न साकार,‘फांदी’ द्वारे अजित साबळेंचे दिग्दर्शकीय पदार्पण

कलेवरच्या निष्ठेने ‘दिग्दर्शनाचे’ स्वप्न साकार,‘फांदी’ द्वारे अजित साबळेंचे दिग्दर्शकीय पदार्पण

googlenewsNext


चित्रपटसृष्टी एक अशी दुनिया आहे जिथे येण्यासाठी बरेचजण स्वप्न पाहात असतात. कधी कधी तर आपण त्यात सहज प्रवेश करु शकू, असा आत्मविश्वासही अनेकांच्या ठायी असतो.  मात्र हा आतला प्रवेश वाटतो तितका सोपा नाही, हे  प्रत्यक्षात आत गेल्यावर लक्षात येतं,  यासाठी आपल्या कामावर निष्ठा असावी लागते.  हीच  निष्ठा  घेऊन अजित साबळे  हे मुंबईत दाखल झाले. मुंबईत कुणाचीही ओळख नव्हती. सुरुवातीला मिळेल ते काम केले. कारण मुंबईत टिकाव धरणे आवश्यक होते. मुंबईत येऊन चहाच्या गाडीवर काम करत दिग्दर्शनाची स्वप्न पाहणारे अजित साबळे आज ती सत्यात उतरवतायेत. नाटक, मालिका, आणि चित्रपटांचा अनुभव घेतल्यानंतर आता ‘फांदी’ चित्रपटाच्या निमित्ताने आपल्या दिग्दर्शकीय कौशल्याची चुणूक दाखवण्यासाठी ते सज्ज झाले आहेत.

‘ध्वज क्रिएशनची’ प्रस्तुती असलेल्या ‘फांदी’ या चित्रपटाच्या लेखनाची व दिग्दर्शनापर्यंतची जबाबदारी अजित यांनी सांभाळली आहे. येत्या शुक्रवारी २७ जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘फांदी’ या चित्रपटाचे चित्रीकरण कोल्हापूरच्या त्यांच्या आजरा तालुक्यात आणि चित्रनगरी गोरेगाव येथे पूर्ण झाले. ‘फांदी’ या चित्रपटाची कथा स्वानुभवातूनच सुचल्याचं अजित सांगतात. काहीजण स्वत:च्या फायद्यासाठी अंधश्रद्धेचं जाळं कशाप्रकारे पसरवतात हे दाखवतानाच एका कुटुबांची राजकीय नेते आणि समाजव्यवस्थेकडून केली जाणरी फसवणूक हा चित्रपट मांडतो.

सायली शशिकांत पाटणकर या चित्रपटाच्या प्रस्तुतकर्त्या असून राजेश खारकर, सायली पाटणकर, महेंद्र सोमासे निर्माते आहेत. अरुण नलावडे, भूषण घाडी, नितीन आनंद बोढारे, संदीप जुवाटकर, विशाल सावंत, अमोल देसाई, बाबा करडे,  कुणाल विभुते, सतीश हांडे, फिरोज फकीर, भाग्यश्री शिंदे, स्नेहा सोनावणे, सुगंधा सावंत, चंदा जांभळे या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत. ‘फांदी’ चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद अजित साबळे यांनी लिहिले आहेत, तर गीतलेखन व संगीताची जबाबदारी कुणाल-करण यांनी सांभाळली आहे.आदर्श शिंदे, बेला शेंडे, नागेश मोरवेकर यांनी गाणी गायली आहेत. छायाचित्रण संजय बापू थोरात तर संकलन अनिल विठ्ठल थोरात यांचे आहे. नृत्यदिग्दर्शन गणेश सरवणकर यांचे आहे. भूषण आंगणे, मृणाली साबळे, विठोबा तेजस, अमोल देसाई, सचिन गायकवाड, जितेंद्र जे.बांभानिया, अनिल शिंदे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. २७ जुलैला ‘फांदी’ सर्वत्र प्रदर्शित होत आहे.


 

Web Title: Fandi Ajit Sabale's directorial debut by In Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.