'फॅन्ड्री'मधील जब्या आणि शालूने केलं लग्न ? मंडपातील फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 12:46 PM2024-10-31T12:46:24+5:302024-10-31T12:47:26+5:30
राजेश्वरी खरात हिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे.
नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा फॅंड्री चित्रपट (Fandry Movie) आणि त्यातील या गाण्यांची क्रेझ आजही कायम आहे. 2013 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात खोलवर भिनलेला आहे. यातील जब्या आणि शालूची लव्ह केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर प्रचंड हिट ठरली. या चित्रपटात जब्या व शालूची भूमिका करणारे सोमनाथ अवघाडे (Somnath Awghade) व राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
राजेश्वरी खरात हिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो लग्नमंडपातील आहे. ज्यात राजेश्वरी आणि सोमनाथ डोक्याला मुंडावळ्या बांधून पाटावर बसल्याचं दिसतंय. या फोटोला तिने 'सर सुखाची श्रावणी...' हे गाणं जोडलं आहे. हा फोटो पाहून राजेश्वरी आणि सोमनाथ हे लग्नबंधनात अडकल्याची चर्चा सुरू झाली आहे. या फोटोला राजेश्वरीने काहीही कॅप्शन दिलेले नाही. त्यामुळे काय फोटोमागचे नेमके सत्य काय आहे, हे स्पष्ट झालेलं नाही.
राजेश्वरी आणि सोमनाथ हे 'फँड्री' चित्रपटातून एका रात्रीत स्टार झाले. दोघांनीही आपल्या अभिनयाने रसिकांना भुरळ घातली होती. खऱ्या आयुष्यातही ते दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याचे बोलले जात होते. आता लग्न मंडपातील फोटो समोर आल्यानंतर राजेश्वरी आणि सोमनाथ हे खरंच लग्नबंधनात अडकले आहेत की हे एखाद्या प्रोजेक्टचे शूट आहे, आता यात खरं काय? हे ती दोघंच सांगू शकतात.