'पुष्पा'मधील 'ओ अंटावा' गाण्याच्या मराठी रिमेकला मिळतेय चाहत्यांची पसंती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 06:32 PM2022-03-21T18:32:38+5:302022-03-21T18:33:16+5:30
Pushpa Movie: 'ओ अंटावा' (O Antava Song) या गाण्याचेदेखील मराठी रिमेक नुकतेच समोर आले आहे.
साउथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन(Allu Arjun)च्या पुष्पा (Pushpa Movie) चित्रपटाला देशभरातून खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. हा चित्रपट रिलीज होऊन बराच काळ उलटून गेला असला तरी अद्याप या चित्रपटाचा फिव्हर काही उतरलेला दिसत नाही. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटातील गाणी आणि डायलॉग्स खूप गाजले. तर यातील सामी सामी, श्रीवल्ली आणि ओ अंटावा ही गाणी खूपच लोकप्रिय ठरली. यातील सामी सामी आणि श्रीवल्ली या गाण्याचे मराठी रिमेक ऐकायला मिळाले. या मराठी रिमेकलादेखील मूळ गाण्याइतकाच चांगला रिस्पॉन्स पाहायला मिळाला. दरम्यान आता ओ अंटावा या गाण्याचेदेखील मराठी रिमेक नुकतेच समोर आले आहे.
सुपरहिट 'पुष्पा' सिनेमातील 'ओ अंटावा' हे कमाल गाजलेले गाणे आता मराठीत सादर झाले आहे. गायिका रागिणी कवठेकर यांनी सादर केलेल्या या गाण्याच्या मराठी व्हर्जनला मुळ गाण्याइतकीच प्रसिद्धी मिळत आहे. यापूर्वी विविध भाषांमध्ये सादर झालेल्या ओ अंटावा गाण्यांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले आहे. विविध पार्ट्या आणि वरातीमध्ये अक्षरशः वेड लावणाऱ्या या गाण्याचे मराठी व्हर्जन देखील तीच जादू कायसम ठेवणार असल्याचा विश्वास या गाण्याच्या संपूर्ण टीमला आहे.
सशांक कोंडविलकर यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याचे संकलन सुधांशू झा, आणि साँग मिक्सिंग डॉनी हजारिका यांनी केलं आहे. हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. पुष्पा चित्रपटाबद्दल सांगायचे तर या चित्रपटाचा दुसरा भागदेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या कामाला लवकरच सुरूवात होणार आहे.