Siddharth Jadhavची अशी अवस्था पाहून हैराण झाले चाहते, व्हिडीओ झाला व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 13:27 IST2022-10-20T13:26:54+5:302022-10-20T13:27:14+5:30
Siddharth Jadhav: सिद्धार्थ जाधवचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

Siddharth Jadhavची अशी अवस्था पाहून हैराण झाले चाहते, व्हिडीओ झाला व्हायरल
मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) याने आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनात घर केले आहे. त्याने मराठीसह बॉलिवूडमध्येही एन्ट्री केली आहे. शेवटचा तो दे धक्का २ चित्रपटात पाहायला मिळाला. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचं सगळीकडे खूप कौतुक झाले. सिद्धार्थ नेहमी वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असतो. दरम्यान त्याचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ पाहायला मिळत आहे. त्याची अवस्था पाहून चाहते हैराण झाले आहेत.
सिद्धार्थ जाधव सोशल मीडियावर सक्रीय असून तो फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. दरम्यान नुकताच त्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून चाहते हैराण झाले आहेत. खरेतर सिद्धार्थ जाधवने शेअर केलेल्या व्हिडीओत तो दादा कोंडके यांच्या लूकमध्ये दिसत आहे आणि त्यांची अॅक्टिंग करताना दिसत आहे. सिद्धार्थ जाधवने हा लूक कोणत्या चित्रपटासाठी केला आहे की कोणत्या इव्हेंटसाठी ते अद्याप कळलेलं नाही. त्याचे चाहते देखील हा व्हिडीओ पाहून तर्कवितर्क लावत आहेत.
सिंबा, सूर्यवंशी यासारख्या चित्रपटांमध्ये सिद्धार्थ जाधवनं महत्त्वाची भूमिका साकारली आहे. त्याच्या या भूमिका प्रेक्षकांना आवडल्या आहेत. मराठीत अनेक उत्तमोत्तम भूमिका निभावणारा सिद्धार्थ गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमध्येही उल्लेखनीय कामगिरी करत आहेत.