'फास्टर फेणे'ला आवडते तूपसाखर पोळी, बालपणीच्या आठवणींना अमेयकडून उजाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2018 11:35 AM2018-06-18T11:35:25+5:302018-06-18T17:05:25+5:30
तूप साखर पोळी हा अनेक महाराष्ट्रीयन मुलांसाठी जीव की प्राण. आपल्यापैकी अनेकांनी बालपणी तूप साखर पोळी मोठ्या आवडीने खाल्ली ...
त प साखर पोळी हा अनेक महाराष्ट्रीयन मुलांसाठी जीव की प्राण. आपल्यापैकी अनेकांनी बालपणी तूप साखर पोळी मोठ्या आवडीने खाल्ली असणार. आजही अनेकजण या तूपसाखर पोळीच्या प्रेमात असल्याचे पाहायला मिळते. मराठमोळा अभिनेता अमेय वाघसुद्धा याला अपवाद नाही. नुकतंच फास्टर फेणे फेम अभिनेता अमेय वाघने तूपसाखर पोळी खातानाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. बालपणीची एक आठवण म्हणून त्याने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. ही तूपसाखर पोळी आपल्यासाठी जीव की प्राण होती असं अमेयने या फोटोसह म्हटलं आहे. बालपणापासूनच शाळेत अशाप्रकारे तूपसाखर पोळी घेऊन जात असे असं अमेयनं या पोस्टमध्ये सांगितलं आहे. आई मोठ्या प्रेमाने ही तूपसाखर पोळी शाळेत डब्ब्यात देत असे असं त्याने म्हटलं आहे. बाहेरच्या गोष्टी खाणं त्यावेळी आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे सांगत तूपसाखर पोळीचे रोल डब्ब्यात दिला जात असे असंही अमेयनं नमूद केलं आहे. अमेयने शेअर केलेल्या या फोटोला अल्पावधीतच बरेच लाइक्स आणि कमेंट्स येऊ लागल्या. काहींनी तर अमेयप्रमाणेच तूपसाखर पोळी खातानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.नाटक कंपनी या ग्रुपच्या माध्यमातून अमेयने अभिनयाची कारकिर्द सुरु केली. यानंतर मुरांबा, फास्टर फेणे या सिनेमातून त्याने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. याशिवाय छोट्या पडद्याच्या माध्यमातूनही अमेय घराघरातील रसिकांचा आवडता नायक बनला.
चित्रपट, मालिका, नाटक क्षेत्रातील कलाकार भूमिकेला योग्य न्याय देण्यासाठी गरज असल्यास वजन वाढवतात देखील आणि कमीही करतात. अर्थात योग्य मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया चालू असते. यासाठी नुकतेच एक हटके उदाहरण द्यायचं झालं तर सर्वांचाच आवडता अभिनेता 'अमेय वाघ'. रितेश देशमुख निर्मित आणि आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'फास्टर फेणे' चित्रपटातील 'बणेश फेणे' च्या भूमिकेतून प्रत्येकाला 'य' मजा घ्यायला मिळावी यासाठी आणि 'फाफे' साठी अमेयने जवळपास १०-११ किलो वजन कमी केले होते.