Father's Day:वडील हेच रिअल लाइफ हिरो – नेहा पेंडसे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2017 08:46 AM2017-06-17T08:46:17+5:302017-06-17T14:16:17+5:30
आपल्या प्रत्येकाच्या जीवनात कुणी ना कुणी आपला आदर्श असतो. त्या व्यक्तीकडे पाहून आपण वागत असतो. त्या व्यक्तीसारखं व्हावं, त्याने ...
आ ल्या प्रत्येकाच्या जीवनात कुणी ना कुणी आपला आदर्श असतो. त्या व्यक्तीकडे पाहून आपण वागत असतो. त्या व्यक्तीसारखं व्हावं, त्याने जीवनात जे काही मिळवलं ते मिळवण्यासाठी आपणही मेहनत करतो, धडपड करतो. आपल्या जीवनातील या हिरोप्रमाणेच आपणही व्हावं, इतरांनी आपलं कौतुक करावं असं आपल्याला वाटत असतं. कुणाचे हिरो सिनेमातील अभिनेता-अभिनेत्री असतात, कुणाचे क्रीडापटू, कुणाचे राजकारणी तर कुणाचे इतर क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती. मात्र अभिनेत्री नेहा पेंडसे हिच्यासाठी तिचे वडील हेच तिचे रिअल लाइफ हिरो आहेत. त्याचं बोट पकडून मोठी झालेल्या नेहाला आपल्या वडिलांचा सार्थ अभिमान आहे. वडिलांची ओळख पटायला बरीच वर्षे लागली असल्याचं नेहानं म्हटलं आहे. मात्र इतक्या वर्षानंतरही आपले वडील आपल्याला पूर्णपणे कळले नसल्याची कबुली तिने दिली आहे. त्यांची संपूर्ण ओळख अद्याप पटली नसल्याचं ते मान्य करते. आपण स्वतंत्र व्यक्तीमत्त्वाचे आहोत असं मी समजत असले तरी त्याची सगळी मूळं आपल्या वडिलांमध्ये असल्याचंही नेहाने प्रांजळपणे कबूल केले आहे. आपले वडिल पोलादी निर्धाराचे, साहसी आणि दिलेला शब्द पाळणारे आहेत असं ती अभिमानाने सांगते. ते कधी चिडतात, आक्रमक होतात तितकेच ते नम्र आहेत असंही तिने सांगितले आहे. सामान्यपणे मुली आपल्या वडिलांची छबी ही आपल्या पतीमध्ये असावी अशी इच्छा बाळगून असतात. नेहाच्या आयुष्यातील हिरो हे तिचे वडील असल्यानेच साहजिकच आपला जीवनसाथीसुद्धा तसाच असावा अशी तिची इच्छा आहे. वडिलांप्रमाणे आपल्या जीवनासाथीमध्ये गुण असावेत असं तिनं म्हटले आहे. माझे वडिल नेहमीच्या पठडीतील वडिल नाहीत, मात्र सगळ्याच मुलींना असे थोर वडिल लाभत नाहीत असं मोठ्या अभिमानाने सांगत नेहाने आपल्या वडिलांबद्दल प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे.