भला माणूस या चित्रपटातील रोमँटिक साँग झाले नागपूरमध्ये चित्रीत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2017 10:12 AM2017-03-24T10:12:35+5:302017-03-24T15:42:35+5:30
संदेश गौरने मन की आवाज प्रतिज्ञा, सूर्या द सुपर कॉप्स, सरस्वतीचंद्र, सुपरकॉप्स व्हर्सेस सुपरव्हिलन्स, मेरी आशिकी तुम से ही, ...
स देश गौरने मन की आवाज प्रतिज्ञा, सूर्या द सुपर कॉप्स, सरस्वतीचंद्र, सुपरकॉप्स व्हर्सेस सुपरव्हिलन्स, मेरी आशिकी तुम से ही, तारक मेहता का उल्टा चष्मा यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. या मालिकेतील त्याच्या भूमिका चांगल्याच गाजल्या होत्या. तसेच त्याने काही नाटकांत आणि वेब सीरिजमध्येदेखील काम केले आहे. त्याने मीराधा या हिंदी चित्रपटातही प्रमुख भूमिका साकारली होती. त्याचा हा चित्रपट अनेक फेस्टिव्हल्समध्येदेखील गाजला होता. या चित्रपटासाठी त्याला एका इंटरनॅशनल फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कारदेखील मिळाला आहे. आता संदेश मराठी चित्रपटाकडे वळला आहे. त्याच्या भला माणूस या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या जोरदार सुरू आहे.
भला माणूस या चित्रपटातील एक रोमँटिक साँग नुकतेच चित्रीत करण्यात आले. हे गाणे या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारे संदेश गौर आणि आकांक्षा साखरकर यांच्यावर चित्रीत करण्यात आहे. या गाण्याचे नागपूरमधील विविध ठिकाणांवर चित्रीकरण करण्यात आले असून या गाण्यात नायक नायिकेला प्रपोज करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे.
काय म्हणावे या प्रेमाला, जेव्हा लागे प्राण पणाला असे या गाण्याचे बोल असून या गाण्याला संगीत दिग्दर्शक मोरेश्वर निस्ताने यांनी संगीत दिले असून हे गाणे प्रसिद्ध गायक राहुल सक्सेनाने गायले आहे. राहुल इंडियन आयडल या कार्यक्रमानंतर प्रकाशझोतात आला. तर हे गाणे सुरेंद्र मेश्राम यांनी लिहिले आहे. विलास राऊत यांनी या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे.
भला माणूस या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय गुमगांवकर करत आहेत. या चित्रपटात संदेश आणि आकांक्षासोबतच अनिल पालकर, चैताली भस्मे, मिलिंद शेटे, नितिन पत्रिकार, प्रतिमा निकोसे, संतोष फुंडे, शुभांदी निर्बाद, अक्षय जोशी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.