Filmfare Awards Marathi 2021 Winners List : 'मराठी फिल्मफेअर पुरस्कार २०२१' मध्ये कलाकारांचा गौरव, नेहा पेंडसे आणि सई ताम्हणकर ठरल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 11:36 AM2022-04-01T11:36:48+5:302022-04-01T11:38:01+5:30

Filmfare Awards Marathi 2021: मराठी सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठेचा समजला जाणारा हा मराठी फिल्मफेअर पुरस्कार २०२१ चा सोहळा नुकताच पार पडला. यामध्ये अनेक मराठी कलाकारांना आणि कलाकृतीला सन्मानित करण्यात आले.

Filmfare Awards Marathi 2021 Winners List: Neha Pendse and Sai Tamhankar got Best Actress award in 'Marathi Filmfare Awards 2021' | Filmfare Awards Marathi 2021 Winners List : 'मराठी फिल्मफेअर पुरस्कार २०२१' मध्ये कलाकारांचा गौरव, नेहा पेंडसे आणि सई ताम्हणकर ठरल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

Filmfare Awards Marathi 2021 Winners List : 'मराठी फिल्मफेअर पुरस्कार २०२१' मध्ये कलाकारांचा गौरव, नेहा पेंडसे आणि सई ताम्हणकर ठरल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

googlenewsNext

सिनेइंडस्ट्रीतील कलाकारंचे दरवर्षी विविध पुरस्कारांनी कौतुक केले जाते. असाच एक सोहळा म्हणजे फिल्मफेअर पुरस्कार. मराठी सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठेचा समजला जाणारा हा मराठी फिल्मफेअर पुरस्कार २०२१ (Filmfare Awards Marathi 2021) चा सोहळा काल (३१ मार्च) संपन्न झाला. यामध्ये अनेक मराठी कलाकारांना आणि कलाकृतीला सन्मानित करण्यात आले. यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार झिम्मा (Jhimma) आणि कारखानिसांची वारी (Karkhanisanchi Wari) या चित्रपटांनी पटकावला. तर अंकुश चौधरीला धुरळा (Dhurala) चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार नेहा पेंडसे(Nehha Pendse)ला 'जून'(June)साठी आणि सई ताम्हणकर(Sai Tamhankar)ला धुरळा (Dhurala) चित्रपटासाठी विभागून देण्यात आला. या सोहळ्यात भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 

प्लॅनेट फिल्मफेअर मराठी अवॉर्ड्स २०२१ च्या सहाव्या आवृत्तीत विजेतेपद पटकावले त्यांची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे:
सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेत्री) - रेशम श्रीवर्धन (जून)
सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेता): रुतुराज वानखेडे - (जयंती) आणि विराट मडके - (केसरी)
सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक: अमर भारत देवकर-(म्होरक्या) आणि नवीन देशबोईना-(लता भगवान करे)
सर्वोत्कृष्ट चित्रपट: झिम्मा आणि कारखानीसांची वारी
सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक: द डिसिपल आणि भोंगा
मराठी चित्रपटसृष्टीतील योगदान: सुलोचना लाटकर
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : मंगेश जोशी  (कारखानीसांची वारी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता : अंकुश चौधरी (धुरळा)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : सई ताम्हणकर - (धुरळा) आणि नेहा पेंडसे (जून)
सर्वोत्कृष्ट अभिनेता समीक्षक: आदित्य मोडक  (द डिसिपल)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री समीक्षक : सोनाली कुलकर्णी (पेन्शन) आणि नीना कुलकर्णी (फोटो-प्रेम)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : सिद्धार्थ जाधव (धुरळा)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: सोनाली कुलकर्णी (धुरळा) आणि गीतांजली कुलकर्णी (कारखानीसांची वारी)
सर्वोत्कृष्ट बालकलाकार : रमण देवकर (म्होरक्या)
सर्वोत्कृष्ट संगीत अल्बम: अमितराज (झिम्मा)
सर्वोत्कृष्ट गीत: गुरु ठाकूर-प्रीतम (कोणा मागं भिरभिरता)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : आदर्श शिंदे- (धुराळा)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका : अपेक्षा दांडेकर (झिम्मा - माझे गाव)
सर्वोत्कृष्ट कथा : अच्युत नारायण- (वेगळी वाट)
सर्वोत्कृष्ट पटकथा : चैतन्य ताम्हाणे- (द डिसिपल)
सर्वोत्कृष्ट संवाद: इरावती कर्णिक  (झिम्मा) आणि क्षितिज पटवर्धन  (धुरळा)
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन: पूजा तलरेजा आणि रवीन डी करडे - (द डिसिपल)
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी: मिचल सोबोसिंस्की - (द डिसिपल)
सर्वोत्कृष्ट संकलन : अभिजित देशपांडे आणि सौरभ प्रभुदेसाई - (बळी)
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत: एव्ही प्रफुल्लचंद्र- (धुरळा)
सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाईन: अनिता कुशवाह आणि नरेन चंदावरकर (द डिसिपल)

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता अमेय वाघ आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव यांनी अगदी उत्कृष्टरीत्या पार पाडले. सोनाली कुलकर्णी, पूजा सावंत, मानसी नाईक, पुष्कर जोग, वैभव तत्ववादी यांच्या परफॉर्मन्सने या सोहळ्याला चारचाँद लावले.

या सोहळ्याला मृणाल कुलकर्णी, पद्मिनी कोल्हापुरे, प्रसाद ओक, मंजिरी ओक, अमृता खानविलकर, प्रतीक गांधी, आदिनाथ कोठारे, सचिन पिळगावकर आणि रेणुका शहाणे या कलाकारांनी हजेरी लावली होती.

Web Title: Filmfare Awards Marathi 2021 Winners List: Neha Pendse and Sai Tamhankar got Best Actress award in 'Marathi Filmfare Awards 2021'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.