Filmfare Awards Marathi: फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात या मराठी चित्रपटानं पटकावले सर्वाधिक पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 10:00 AM2023-04-01T10:00:09+5:302023-04-01T10:00:46+5:30

Filmfare Awards Marathi : मराठी चित्रपटसृष्टीत फिल्मफेअर पुरस्काराची नेहमीच चर्चा असते. नुकताच फिल्मफेअर पुरस्काराचा रंगतदार सोहळा पार पडला.

Filmfare Awards Marathi: This Marathi film won the highest number of awards at the Filmfare Awards ceremony | Filmfare Awards Marathi: फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात या मराठी चित्रपटानं पटकावले सर्वाधिक पुरस्कार

Filmfare Awards Marathi: फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात या मराठी चित्रपटानं पटकावले सर्वाधिक पुरस्कार

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीत फिल्मफेअर पुरस्काराची नेहमीच चर्चा असते. नुकताच फिल्मफेअर पुरस्काराचा रंगतदार सोहळा पार पडला. या सोहळ्याला अनेक मराठी कलाकारांनी ग्लॅमरस लूकमध्ये हजेरी लावली. या पुरस्कारांची घोषणा झाली आहे.

यंदाच्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये ‘गोदावरी’ चित्रपटाने बाजी मारलेली पाहायला मिळाली. जितेंद्र जोशी निर्मित ‘गोदावरी’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. त्याबरोबर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक निखिल महाजन, सर्वोत्कृष्ट पटकथा निखिल महाजन, प्राजक्त देशमुख, सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत ए. व्ही. प्रफुल्लचंद्र आणि जितेंद्र जोशीला बेस्ट क्रिटिक्स अभिनेता म्हणून पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे गोदावरीचा फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यातही डंका पाहायला मिळाला. 


गुरुवारी ३० मार्चला अनेक कलाकार आणि तंत्रज्ञांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या शोचे सूत्रसंचालन अमेय वाघ आणि सिद्धार्थ जाधव यांनी केले होते. अप्रतिम वैदेही परशुरामी, संस्कृती बालगुडे आणि अमृता खानविलकर यांनी आपल्या मनमोहक नृत्याविष्काराने रंगमंचावर धुमाकूळ घातला. श्रेयस तळपदेनेही एक पॉवरपॅक परफॉर्मन्स दिला, त्यानंतर सोनाली कुलकर्णी आणि पुष्कर जोग यांच्या अभिनयासह इतर.

विजेत्यांची यादी पुढीलप्रमाणे -
सर्वोत्कृष्ट चित्रपट: गोदावरी
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: निखिल महाजन (गोदावरी)
प्रमुख भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष): प्रसाद ओक (धर्मवीर)
प्रमुख भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता (महिला): सायली संजीव (गोष्ट एक पैठणीची)
सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष): नंदू माधव (वाय)
सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता (महिला): अनिता दाते (मी वसंतराव)
सर्वोत्कृष्ट संगीत अल्बम: अजय अतुल (चंद्रमुखी)
सर्वोत्कृष्ट गीत: वैभव जोशी- कैवल्यगान (मी वसंतराव)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (पुरुष): राहुल देशपांडे- कैवल्यगान (मी वसंतराव)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका (महिला): आर्या अंबेकर- बाई गा (चंद्रमुखी)
सर्वोत्कृष्ट कथा: शंतनू गणेश रोडे (गोष्ट एक पैठणीची)
सर्वोत्कृष्ट पटकथा: निखिल महाजन आणि प्राजक्ता देशमुख (गोदावरी)
सर्वोत्कृष्ट संवाद : प्रवीण तरडे (धर्मवीर)
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन: अशोक लोकरे आणि ए. रुचा (मी वसंतराव)
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी: महेश लिमये (सरसेनापती हंबीरराव)
सर्वोत्कृष्ट संपादन: जयंत जठार (वाय)
सर्वोत्कृष्ट पार्श्वभूमी स्कोअर: ए व्ही प्रफुल्लचंद्र (गोदावरी)
सर्वोत्कृष्ट ध्वनी रचना: अनमोल भावे (मी वसंतराव)
सर्वोत्कृष्ट वेशभूषा : सचिन लोवळेकर (मी वसंतराव)
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन: दीपाली विचारे- चंद्रा (चंद्रमुखी)
सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक: अजित वाडीकर (वाय) आणि  तृशांत इंगळे (झॉलीवूड)
सर्वोत्कृष्ट पदार्पण (महिला): गौरी इंगवले (पांघरुण) आणि हृता दुर्गुळे (अनन्या)
सर्वोत्कृष्ट बाल कलाकार: आर्यन मेंघजी आणि खुशी हजारे
सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी समीक्षक पुरस्कार: मी वसंतराव (निपुन धर्माधिकारी)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी समीक्षक पुरस्कार (पुरुष): जितेंद्र जोशी (गोदावरी)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी समीक्षक पुरस्कार (महिला): सई ताम्हणकर (पोंडिचेरी)
जीवनगौरव पुरस्कार: डॉ. जब्बार पटेल

मराठी कलाविश्वातील प्रमुख व्यक्ती त्यांच्या फॅशनेबल गाऊन आणि साड्यांमध्ये रेड कार्पेटवर ग्लॅमर आणि स्टाईलने वावरत असताना हा कार्यक्रम स्टार्सने भरलेला होता.अमृता खानविलकर, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, गिरीजा ओक, मृणाल कुलकर्णी, नंदिता धुरी, मुग्धा गोडबोले, नेहा पेंडसे, नीना कुलकर्णी, किशोरी शहाणे, श्वेता शिंदे, क्रांती रेडकर, तेजस्वी रणवीर, तेजस्वी रानविलकर आणि कृष्णा कुलकर्णीने उपस्थिती लावली होती. 

Web Title: Filmfare Awards Marathi: This Marathi film won the highest number of awards at the Filmfare Awards ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.