यंदाच्या गणेशोत्सवाला भेटीला येणार सिनेकलाकार आणि कोरोना योद्धांचा 'सुखकर्ता दुःखहर्ता'  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 05:33 PM2020-08-21T17:33:05+5:302020-08-21T17:34:20+5:30

गणेश चतुर्थीला प्रदर्शित होत असलेल्या 'सुखकर्ता दुःखहर्ता' या आरतीमध्ये अनेक प्रसिद्ध कलाकारांबरोबरच खऱ्या आयुष्यातील नायकांचादेखील समावेश आहे.

Filmmaker and Corona Warriors' 'Sukhakarta Dukhkhaharta' to visit this year's Ganeshotsav | यंदाच्या गणेशोत्सवाला भेटीला येणार सिनेकलाकार आणि कोरोना योद्धांचा 'सुखकर्ता दुःखहर्ता'  

यंदाच्या गणेशोत्सवाला भेटीला येणार सिनेकलाकार आणि कोरोना योद्धांचा 'सुखकर्ता दुःखहर्ता'  

googlenewsNext

सालाबादप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली आहे, यंदाचा गणेशोत्सव थोडा वेगळा जरी असला तरी, बाप्पाच्या आगमनाची आतुरता प्रत्येकाला आहे. हीच आतुरता लक्षात घेत पूजा इंटरेंटमेंट निर्मित गणेशाची 'सुखकर्ता दु:खहर्ता' ही आरती नव्या स्वरूपात सादर होत आहे. गणेश चतुर्थीला प्रदर्शित होत असलेल्या  'सुखकर्ता दुःखहर्ता' या आरतीमध्ये अनेक प्रसिद्ध कलाकारांबरोबरच खऱ्या आयुष्यातील नायकांचादेखील समावेश आहे.

संगीतकार आदित्य बर्वे ह्यांच्या संकल्पनेतून आकारास आलेल्या 'सुखकर्ता दुःखहर्ता' या आरतीला आदित्य ऋषी केदार ह्या गप्पाटप्पा बँडने संगीतबद्ध केले आहे.

विघ्नहर्त्याचा गजर करणाऱ्या ह्या आरतीमध्ये कोरोना काळात आपली जबाबदारी बजावत असलेले वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, अग्निशमन दल, सफाई कामगार ते अगदी पत्रकारांपर्यंत प्रत्येकांचा समावेश आहे. शिवाय, दीपाली सय्यद. किशोरी शहाणे. विजय पाटकर, चिराग पाटील, विणा जगताप यांसारख्या अनेक प्रसिद्ध कलाकारांनी देखील या आरतीत सहभाग दर्शविला आहे.

रील आणि रियल नायकांना एकत्र आणणारी 'सुखकर्ता दुःखहर्ता' ही नवीन आरती यंदाच्या गणेशोत्सवात लोकांच्या मनात नवा उत्साह भरण्यास यशस्वी ठरेल, यात शंका नाही.

Web Title: Filmmaker and Corona Warriors' 'Sukhakarta Dukhkhaharta' to visit this year's Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.