घाट चित्रपटाची पहिली झलक रसिकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 09:57 AM2017-11-27T09:57:32+5:302017-11-27T15:27:32+5:30

ज्ञानोबा माऊलीच्या आळंदी घाटावर जिथे लोक जीवनाचा मोक्ष मिळवण्यास येतात अशाच पवित्र घाटावर उपेक्षितांच आयुष्य जगणाऱ्या कुटुंबाच्या संघर्षाची कहाणी ...

The first glimpse of the ghat movie is to meet the fans | घाट चित्रपटाची पहिली झलक रसिकांच्या भेटीला

घाट चित्रपटाची पहिली झलक रसिकांच्या भेटीला

googlenewsNext
ञानोबा माऊलीच्या आळंदी घाटावर जिथे लोक जीवनाचा मोक्ष मिळवण्यास येतात अशाच पवित्र घाटावर उपेक्षितांच आयुष्य जगणाऱ्या कुटुंबाच्या संघर्षाची कहाणी म्हणजे ‘घाट’ हा चित्रपट. नुकतीच या चित्रपटाची पहिली झलक मान्यवरांच्या उपस्थितीत दाखवण्यात आली. आळंदी घाटाच्या पार्श्वभूमीवर दोन मित्रांची फुललेली कहाणी दाखवतानाच  जगण्यासाठी माणसाला करावी लागणारी धडपड मांडणाऱ्या ‘घाट’ ची निर्मीती सचिन जरे यांनी केली असून दिग्दर्शन राज गोरडे यांनी केलं आहे. जरे एंटरटेन्मेंटची प्रस्तुती असलेला ‘घाट’ येत्या १५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
 
या चित्रपटादरम्यान आमचे छान सूर जुळले होते असं सांगताना त्याची झलक चित्रपटातही दिसेल असा विश्वास दिग्दर्शक राज गोरडे व चित्रपटातील कलाकारांनी व्यक्त केला. मन्या व पप्या यांच्या नात्याचा हळवा बंध उलगडून दाखवतानाच तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी राहणाऱ्या कुटुंबांच्या जगण्यातील दाहक वास्तव ‘घाट’ च्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे.
 
कथेच्या मागणीनुसार या चित्रपटात ज्ञानोबा माउलींचा एक गजर असून हा गजर वैभव देशमुख यांनी लिहिला असून प्रसिद्ध गायिका सोना मोहपात्रा यांनी स्वरबद्ध केला आहे. रोहित नागभिडे यांनी या चित्रपटाला संगीत दिलं असून, राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या महावीर साबन्नवार यांनी साऊंड डिझाइनिंगचं काम पाहिलं आहे. यश कुलकर्णी, दत्तात्रय धर्मे या दोन लहान मुलांसोबत मिताली जगताप, उमेश जगताप, रिया गवळी यांच्याही ‘घाट’ मध्ये भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा- पटकथा- संवाद राज गोरडे यांचे आहेत. प्रकाश बल्लाळ या चित्रपटाचे कलादिग्दर्शक आहेत. छायांकन अमोल गोळे तर संकलन सागर वंजारी यांचे आहे. रंगभूषा आणि केशभूषा रसिका रावडे यांनी केली असून, शीतल पावसकर यांनी कॅास्च्युम डिझाइन केले आहेत. विठ्ठल गोरडे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत, तर विनायक पाटील निर्मिती व्यवस्थापक आहेत.१५ डिसेंबरला ‘घाट’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Web Title: The first glimpse of the ghat movie is to meet the fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.