उणे ४ डिग्रीमध्ये चित्रीत केलेला पहिला मराठी चित्रपट 'आरॉन'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 06:30 AM2018-11-17T06:30:00+5:302018-11-17T06:30:00+5:30

आगामी मराठी चित्रपट 'आरॉन' बहुतांश फ्रांसमधील पॅरिसमध्ये चित्रीत झाला आहे व त्या शहराचे व आजुबाजुकडील परिसराचे विहंगम चित्र या चित्रपटातून दर्शविण्यात आले आहे.

First Marathi film 'Aaron' shot in under 4 degree | उणे ४ डिग्रीमध्ये चित्रीत केलेला पहिला मराठी चित्रपट 'आरॉन'

उणे ४ डिग्रीमध्ये चित्रीत केलेला पहिला मराठी चित्रपट 'आरॉन'

googlenewsNext
ठळक मुद्दे'आरॉन' चित्रपटाचा ‘क्रू’ मध्ये तब्बल ८०% तंत्रज्ञ फ्रेंच काही भागांचे चित्रीकरण झाले उणे ४ डिग्रीमध्ये

पूर्वी परदेशात फार कमी चित्रपटांचे चित्रीकरण होत असे. परंतु प्रेक्षकांची जगभरातील प्रेक्षणीय स्थळे बघण्याची उत्सुकता लक्षात घेऊन अनेक निर्माते आपल्या चित्रपटांचे चित्रीकरण परदेशात करू लागले. प्रेक्षकांना पडद्यावर नयनरम्य दृश्ये दिसत असली तरी ती चित्रीत करताना आलेल्या अडचणींबाबत ते अनभिज्ञ असतात. आगामी मराठी चित्रपट 'आरॉन' बहुतांश फ्रांसमधील पॅरिसमध्ये चित्रीत झाला आहे व त्या शहराचे व आजुबाजुकडील परिसराचे विहंगम चित्र या चित्रपटातून दर्शविण्यात आले आहे. परंतु तिथे शूट करताना कलाकार व तंत्रज्ञांना बरीच मेहनत करावी लागली.
'आरॉन' चित्रपटाचा ‘क्रू’ मध्ये तब्बल ८०% तंत्रज्ञ फ्रेंच होते. काही भागांचे चित्रीकरण उणे ४ डिग्री मध्ये झाले. तिथल्या ‘क्रू’ ला त्या थंड हवामानाची सवय होती. परंतु भारतीय तंत्रज्ञ आणि कलाकार यांना त्या तापमानात शूटिंग करणे अवघड जात होते. परंतु तिथल्या लोकांनी आपल्या लोकांची विशेष काळजी घेतली व आपल्या कलाकारांनीदेखील जिद्दीने चित्रीकरण पूर्ण केले. 

'आरॉन' पहिला मराठी चित्रपट आहे जो मुख्यत्वे परदेशात चित्रीत झाला आहे. तसेच या चित्रपटाबरोबर तब्बल अर्धा डझन नॅशनॅलिटीची माणसे जोडली गेली आहेत. आरॉन हे एक फ्रेंच नाव आहे आणि या चित्रपटाचा संबंध फ्रान्सशी आहे. इतकेच नव्हे तर या मराठी चित्रपटाचा संबंध एकूण सहा देशांशी आहे. फ्रान्स रोमेनिया, इस्राएल, कॅनडा, हंगेरी आणि अर्थातच भारत. या चित्रपटाचा डीओपी हंगेरीचा, क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहे इस्राएलचा, आर्ट डिरेक्टर रोमेनियाचा आहे. त्याचप्रमाणे बहुतांश पॅरिसमध्ये शूट झालेल्या या चित्रपटामध्ये कॅनेडियन, फ्रेंच आणि इंडियन कलाकार आहेत.
'आरॉन' या मराठी चित्रपटाची कथा युरोप मधील पॅरिस या रोमँटिक आणि नयनरम्य शहरात घडते. या सिनेमाचे जवळपास ८०% चित्रण फ्रान्स मध्ये झाले असून उर्वरित भाग भारतातील लहानश्या गावात चित्रीत झाले आहे. जिएनपी फिल्म्सची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती गिरीश नारायण पवार, कौस्तुभ लटके, अविनाश अहेर यांनी केली असून ओमकार रमेश शेट्टी यांनी दिग्दर्शनाची धुरा वाहिली आहे. आरॉन हा मराठी चित्रपट येत्या ७ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Web Title: First Marathi film 'Aaron' shot in under 4 degree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.