मराठी चित्रपटाच्या इतिहासात प्रथमच बॉलीवूडच्या दिग्गज पार्श्वगायकांची विक्रमी हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2018 03:56 AM2018-01-09T03:56:57+5:302018-01-09T10:20:24+5:30
हॉस्टेल डेज’ या बहुचर्चित मराठी चित्रपटातील गाणी कुमार सानू, शंकर महादेवन, सोनू निगम, शान, कुणाल गांजावाला, बेला शेंडे, अवधूत ...
lass="m_7614114028380057339gmail-m_6276272377440999231m_8146454539886165862m_8339928220860744124m_4174371304329304178m_4513459608028858832m_-7848308864275560436m_-5022165322121633146gmail-m_-1129554543330593653m_-7041538815184375070m_8222860722504067757m_6512743536637375835gmail-MsoNoSpacing" style="color: rgb(34, 34, 34); font-size: 12.8px; font-family: arial, sans-serif; text-align: justify;">हॉस्टेल डेज’ या बहुचर्चित मराठी चित्रपटातील गाणी कुमार सानू, शंकर महादेवन, सोनू निगम, शान, कुणाल गांजावाला, बेला शेंडे, अवधूत गुप्ते आदी बॉलीवूडमधील दिग्गजानी गायली असून एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे पार्श्वगायक मराठी चित्रपटात गाण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असेल. या ख्यातनाम गायकांनी गायलेल्या या गाण्यांमुळे वेगळ्या विषयावरील या चित्रपटाबद्दची रसिकांमधील उत्सुकता आणखीनच वाढली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या संगीत प्रकाशनाचा समारंभ ३० नोव्हेंबर रोजी मुंबईत पार पडला. या चित्रपटाचे संगीत प्रकाशन बॉलीवूडचे सुप्रसिद्ध गायक कुमार शानू, शान, कुणाल गांजावाला, बेला शेंडे, अवधूत गुप्ते आणि दिग्दर्शक व संगीतकार अजय नाईक यांच्या प्रमुख उपस्थित मुंबईत करण्यात आले. ‘हॉस्टेल डेज’ १२ जानेवारी २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
हिंदीतील या पार्श्वगायकांबरोबरच प्रियांका बर्वे, आनंदी जोशी, रुचा बोंद्रे या नव्या दमाच्या गायक कलाकारांचीही गाणी या चित्रपटात आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि आघाडीचे लेखक अजय नाईक यांनीच या चित्रपटाला संगीत दिले आहे. 'हॉस्टेल डेज'मध्ये प्रार्थना बेहेरे, आरोह वेलणकर आणि विराजस कुलकर्णी, अक्षय टंकसाळे आणि संजय जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
या संगीत प्रकाशनसमयी गायक कुमार शानू म्हणाले की ‘या चित्रपटात गाणे गायला मला खूप मजा आली आणि ह्या चित्रपटाचे संगीत सगळ्यांना नक्कीच आवडेल. अजय नाईकनी चित्रपटातील सर्व गाण्यांना खूप सुंदर संगीत दिले आहे’. कुणाल गांजावाला यांनी म्हटले की ‘अजय हा एक हुशार दिग्दर्शक, लेखक व उत्तम संगीतकार सुद्धा आहे. या चित्रपटातील गाणी तरुणाईला वेड लावतील,. गायक शान यांनी सांगितले की ‘मी चित्रपटात जे गाणे गायले आहे, त्या गाण्यामुळे मला हॉस्टेलची मजा अनुभवायला मिळाली. अजयच्या या चित्रपटाला मी शुभेच्छा देतो, व सर्वांनी हा चित्रपट सिनेमागृहात येऊन नक्की पहावा’.