मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पहिल्यांदा अंडर वॉटर गाण्याचं शूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2017 12:04 PM2017-01-06T12:04:59+5:302017-01-06T12:04:59+5:30

सध्या मराठी इंडस्ट्री यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. या चित्रपटसृष्टीत अनेक नवनवीन आणि वेगवेगळे विषय हाताळले जात असल्याचे पाहायला मिळत ...

For the first time in the Marathi film industry, shooting under-water songs | मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पहिल्यांदा अंडर वॉटर गाण्याचं शूटिंग

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पहिल्यांदा अंडर वॉटर गाण्याचं शूटिंग

googlenewsNext
्या मराठी इंडस्ट्री यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. या चित्रपटसृष्टीत अनेक नवनवीन आणि वेगवेगळे विषय हाताळले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे असे विविध विषयावरील चित्रपट हीटदेखील होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आज मराठी इंडस्ट्री बॉक्सआॅफीसवर करोंडोचा गल्ला पार पाडताना दिसत आहे. सैराट हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. या चित्रपटाने जागतिक पातळीवर आपल्या नावाचा ठसा उमटविला आहे. एवढेच नाही तर या चित्रपटाचे आता बॉलिवुड आणि दाक्षिणात्य रिमेकदेखील येऊ घालत असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचे हे यश पाहता, खरचं मराठी इंडस्ट्रीचे हे यश नक्कीच कौतुकास्पद आहे. या चित्रपटसृष्टीत सातत्याने नवनवीन प्रयोग करण्याचा प्ऱयत्न पाहायला मिळत आहे. आता असाच एक अनोखा प्रयत्न पहिल्यांदा मराठी चित्रपटसृष्टीत होताना दिसत आहे. 'प्रेमाय नम:' हा नवीन मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.  प्रेमावर आधारित हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदा मराठी चित्रपटसृष्टीत एका गाण्याचे शूटिंग हे  अंडर वॉटर करण्यात आले आहे. एक पूर्ण गाणं अंडर वॉटर करण्याचं धाडस या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने उचललं आहे. विशेष म्हणजे मराठी मध्ये पहिल्यांदा असा प्रयोग करण्यात आला असून  हा नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल यात काही शंका नाही. व्हाईट ओनियन एंटरटेनमेंट प्रस्तुत जगदीश वठारकर दिग्दर्शित 'प्रेमाय नम:' हा चित्रपट नक्कीच मराठी चित्रपटसृष्टीमध्ये काहीतरी नावीन्य आणेल.  १० फेब्रुवारीला आपल्या जवळच्या चित्रपट गृहात हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

Web Title: For the first time in the Marathi film industry, shooting under-water songs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.