मराठीमध्ये पहिल्यांदा सिंगल साँगचे चित्रिकरण परदेशात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2017 05:24 PM2017-01-08T17:24:12+5:302017-01-09T12:15:07+5:30
बॉलिवुडप्रमाणेच सध्या मराठीमध्येदेखील सिंगल साँगची क्रेझ निर्माण झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. एकापाठोपाठ एक सिंगल साँग प्रेक्षकांच्या भेटिला येत ...
ब लिवुडप्रमाणेच सध्या मराठीमध्येदेखील सिंगल साँगची क्रेझ निर्माण झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. एकापाठोपाठ एक सिंगल साँग प्रेक्षकांच्या भेटिला येत असल्याचे दिसत आहे. आता लवकरच आणखी एक सिंगल साँग खास प्रेक्षकांसाठी सज्ज झाले आहे. विशेष म्हणजे हे सिंगल साँग लंडन येथे चित्रिकरण करण्यात आले आहे. मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यादांच सिंगल सॉंग परदेशात चित्रिकरण होत असल्याचे गायक निखिल रानडे याने लोकमत सीएनएक्सला सांगितले. निखिल सांगतो, मला खूप आनंद होत आहे की, पहिल्यांदा मी मराठीचित्रपटसृष्टीत असा वेगळा प्रयोग करत आहे. खरं सांगू का हे गाणे लंडन येथे चित्रिकरण करण्यामागचा हेतू असा होता की, सध्या मराठी चित्रपट यशाच्या शिखरावर पोहोचले आहे. मात्र मराठी सिंगल साँगला तेवढे चांगले दिवस आले नाही. म्हणून प्रेक्षकांचा सिंगल साँग विषयीचा दृष्टिकोन बदलण्यासाठी मी हा छोटासा प्ऱयत्न केला आहे. त्याचबरोबर या गाण्यात मला ग्लॅमर दाखवायचे होते. तसेच युथला मराठी गाण्यांची तितकीशी ओळख नसते. खास युथसाठी एक मेलिडी साँग बनवायचे होते. आज ती इच्छा इशारा तुझा या सिंगल साँगच्या माध्यमातून पूर्ण झाली आहे. या गाण्याचे चित्रिकरण करताना खूप मजा आली. एक छान आणि वेगळा अनुभव मिळाला आहे. तसेच लंडन येथील महाराष्ट्र मित्र मंडळानेदेखील मदत केली. त्याचबरोबर गाण्याच्या चित्रिकरणावेळी येथील स्थानिक लोक मला छान लोकेशनदेखील सुचवत होते. या गाण्याच्या गायनाबरोबरच मी अभिनयदेखील केला आहे. माझ्यासोबत या गाण्यात प्रियंका ठाकरे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. या गाण्यात एका सुंदर जोडीचा प्रवास दाखविला आहे. त्यांच्या पहिल्या भेटिपासून ते लग्नापर्यतचा प्रवास या गाण्यातून व्यक्त करण्यात आलं आहे. या गाण्याचे दिग्दर्शन राजीव रानडे यांनी केले असून हे गाणं ऋषीकेश नेरे याने शब्दबद्ध केले आहे. तर या गाण्याला संगीत रशमीन महागावकरचे आहे. हे गाणे नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल असा विश्वासदेखील निखिलने यावेळी व्यक्त केला आहे.