लोकप्रिय मराठी रील स्टारचं 'एक दोन तीन चार'मधून पदार्पण, खळखळून हसवणारा टीझर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 12:49 PM2024-07-08T12:49:12+5:302024-07-08T12:49:40+5:30

निपुण धर्माधिकारी-वैदेही परशुरामीच्या आगामी 'एक दोन तीन चार' मधून प्रसिद्ध मराठी इनफ्लुएन्सरची एन्ट्री झालीय (1234 The Film)

focused indian karan sonawade debut in marathi movie 1234 vaidehi parshurami nipun dharmadhikari | लोकप्रिय मराठी रील स्टारचं 'एक दोन तीन चार'मधून पदार्पण, खळखळून हसवणारा टीझर रिलीज

लोकप्रिय मराठी रील स्टारचं 'एक दोन तीन चार'मधून पदार्पण, खळखळून हसवणारा टीझर रिलीज

मराठी मनोरंजन विश्वातील ‘एक दोन तीन चार' चित्रपटाची सध्या खूप चर्चा आहे. या चित्रपटातून एक युनिक आणि वेगळी कहाणी लोकांसमोर येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून विनोदी शैली आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर इंस्टाग्रामवर राज्य करणारा मराठमोळा सोशल मिडिया स्टार करण सोनावणे उर्फ फोकस्ड इंडियन आता मोठ्या पडद्यावर पदार्पण करायला सज्ज आहे. करण पहिल्यांदाच  ‘एक दोन तीन चार' ह्या नव्या मराठी चित्रपटात एका मुख्य भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजक करताना दिसणार आहे. करणची भूमिकेची झलक दिसणारा चित्रपटाचा नवीन टीझर भेटीला आलाय.

सोशल मीडिया स्टार करण पहिल्यांदाच चित्रपटात

आज चित्रपटाचा एक खास टीझर रिलीज केला आहे, ज्यात करणच्या धमाकेदार पंचलाइन खळखळून हसवायला भाग पाडत आहेत.  सोशल मिडिया गाजवल्यानंतर करणचे फॅन्स त्याच्या ह्या नव्या अवताराची आतुरतेने वाट बघताय. प्रेक्षकांचा हा उत्साह बघता, आपल्या भावना शेअर करत करण म्हणतो की, "मला कळविण्यात आनंद होतोय की, आज माझ्या पहिल्या मराठी चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे , तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने मी इथपर्यंत प्रवास करू शकलो,  मला आशा आहे की, इंस्टाग्रामवर जस तुम्ही माझ्यावर भरभरून प्रेम करता, तसंच मोठ्या पडद्यावरही मला बघताना कराल. माझ्या प्रत्येक कामातून प्रेक्षकांना आनंद देण्याचा मी नक्कीच प्रामाणिक प्रयत्न करत राहीन."

या दिवशी एक दोन तीन चार होणार रिलीज

वरुण नार्वेकर दिग्दर्शित ‘एक दोन तीन चार' ह्या चित्रपटात वैदेही परशुरामी, निपुण धर्माधिकारी बरोबर इतर कलाकार जसे  मृणाल कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, सतीश आळेकर, शैला घाणेकर दमदार भूमिकेत दिसणार आहेत.  त्यामुळे ह्या सर्वांसोबत करणची जुगलबंदी नक्की कशी जमते हे बघणं रोमांचक ठरणार आहे. 'एक दोन तीन चार' चित्रपटात १९ जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे.  

Web Title: focused indian karan sonawade debut in marathi movie 1234 vaidehi parshurami nipun dharmadhikari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.