पर्ण आता वेब सिरीजच्या वाटेवर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2016 05:28 PM2016-10-26T17:28:07+5:302016-10-26T17:28:07+5:30

नाटक, मालिका, चित्रपटानंतर आता वेब शो देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. म्हणून तर मराठी इंडस्ट्रीमध्ये एक पाठोपाठ एक वेब ...

The fol is now on the way to the web series | पर्ण आता वेब सिरीजच्या वाटेवर

पर्ण आता वेब सिरीजच्या वाटेवर

googlenewsNext
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">नाटक, मालिका, चित्रपटानंतर आता वेब शो देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. म्हणून तर मराठी इंडस्ट्रीमध्ये एक पाठोपाठ एक वेब शो येत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता हेच पाहा ना, कास्टिंग काऊच, बापाचा रस्ता, स्टर्गलर साला, बॅक बेंचर्स असे एक से एक वेब शोचा आनंद प्रेक्षकांना लुटता येत आहे. आता अशातच आणखी एक वेब शोची भर पडणार आहे. आपल्या बापाची सोसायटी असे या नव्या वेब शोचे नाव असणार आहे.  आपल्या बापाची सोसायटी या वेब शोचे दिग्दर्शन सारंग साठे यांनी केले आहे. विशेष म्हणजे या वेब शो मध्ये अभिनेत्री पर्ण पेठे आणि मुण्मयी गोडबोले झळकणार आहेत. पर्ण पेठे हिचा नुकताच फोटोकॉपी, वाय झेड हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील अभिनयाने तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. तसेच रमा माधव या ऐतिहासिक चित्रपटातील तिची भूमिकादेखील प्रेक्षकांना आवडली होती. अशा वेगवेगळया भूमिकेतून दिसणारी पर्ण आता थेट वेब शो मध्ये पाहायला मिळणार आहे. तिच्या या वेब शो विषयी लोकमत सीएनएक्सला पर्ण सांगते, '' हा माझा आणि मृण्मयीचा पहिलाच वेब शो आहे. त्यामुळे हा एक वेगळाच अनुभव मला मिळणार आहे. '' त्यामुळेदेखील मी अधिक उत्साही झाली असल्याचे पर्ण सांगते. कास्टिंग काऊच, आपल्या बापाचा रस्ता या वेब शोनंतर आता, भाडिपचा हा पुढचा एपिसोड असणार आहे. सध्या वेब शो हे जबरदस्त चालत आहे. त्यांचा प्रेक्षक वर्ग देखील वाढत चालला आहे. त्यामुळे या वेब शोच्या माध्यमातून मला अधिककाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार आहे. आपल्या बापाची सोसायची हा वेब शो नक्कीच प्रेक्षकांची धमाल उडविणार आहे. 

Web Title: The fol is now on the way to the web series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.