"भारताच्या अर्थव्यवस्थेला कलाटणी देणारे...", मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर रितेश देशमुखची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 11:13 IST2024-12-27T11:09:31+5:302024-12-27T11:13:36+5:30

देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग कालवश, अभिनेता रितेश देशमुखने शेअर केले वडिलांसोबतचे फोटो.

former president manmohan singh passes away marathi cinema actor riteish deshmukh shared emotional post on social media | "भारताच्या अर्थव्यवस्थेला कलाटणी देणारे...", मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर रितेश देशमुखची पोस्ट

"भारताच्या अर्थव्यवस्थेला कलाटणी देणारे...", मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर रितेश देशमुखची पोस्ट

Riteish Deshmukh Post: देशाच्या अर्थव्यवस्थेला कलाटणी देणारे तसेच जागतिक अर्थव्यवस्थेत भारताला नवी उंची मिळवून देणारे माजी पंतप्रधान ख्यातनाम अर्थतज्ज्ञ  डॉ. मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनाने सारा देश हळहळला आहे. राजकीय तसेच मनोरंजनविश्वातूनही शोक व्यक्त करण्यात येत आहे. सिनेसृष्टील कलाकार मंडळी सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत. दरम्यान, मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) सोशल मीडियावर वडील विलासराव देशमुख आणि मनमोहन सिंग यांचे फोटो पोस्ट करत श्रद्धांजली वाहिली आहे.

आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर रितेश देशमुखने विलासराव देशमुख यांचे मनमोहन सिंग यांचे फोटो शेअर करत लिहिलंय की, "आज आपण भारतातील एक उत्कृष्ट पंतप्रधान गमावला आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेला कलाटणी देणारे तसेच प्रतिष्ठा आणि नम्रतेच ते एक उत्तम उदाहरण होते. आम्ही सदैव त्यांचे ऋणी राहू. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. धन्यवाद श्री मनमोहन सिंग जी."अशी पोस्ट शेअर करत अभिनेत्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

काल डॉ. मनमोहन सिंग २६ डिसेंबर रोजी अचानक घरी बेशुद्ध पडले, त्यांनी रात्री ८.०६ वाजता दिल्ली एम्समध्ये दाखल करण्यात आले. यानंतर एम्सने एक निवेदन प्रसिद्ध केले. या निवेदनात सिंग यांच्या मृत्यूची घोषणा केली.

Web Title: former president manmohan singh passes away marathi cinema actor riteish deshmukh shared emotional post on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.