देवदत्त नागेनी दाखविली अलिबागच्या रस्त्याची दैना; नेटिझन्सनी म्हटले ‘देवा आता तुम्हीच काहीतरी करा’!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2017 04:37 PM2017-07-19T16:37:51+5:302017-07-19T22:07:51+5:30

राज्यातील बहुतांश भागात वरुणराजाची कृपादृष्टी होत असून, सर्वत्र आनंदाचा वर्षाव होत आहे; मात्र या वर्षावात दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी यंत्रणेचे पितळ ...

The fort of Alibag road shown by Devadatta Nagane; Netizens said, 'now you do something!' | देवदत्त नागेनी दाखविली अलिबागच्या रस्त्याची दैना; नेटिझन्सनी म्हटले ‘देवा आता तुम्हीच काहीतरी करा’!

देवदत्त नागेनी दाखविली अलिबागच्या रस्त्याची दैना; नेटिझन्सनी म्हटले ‘देवा आता तुम्हीच काहीतरी करा’!

googlenewsNext
ज्यातील बहुतांश भागात वरुणराजाची कृपादृष्टी होत असून, सर्वत्र आनंदाचा वर्षाव होत आहे; मात्र या वर्षावात दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी यंत्रणेचे पितळ उघडे पडल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न चिघळत असताना ‘जय मल्हार’ मालिकेत खंडोबाची भूमिका साकारणाºया अभिनेता देवदत्त नागे याने अलिबागमधील रस्त्यांची झालेली दैना दाखविणारा एक फोटो फेसबुकवर पोस्ट करून यंत्रणेचे अपयश दाखवून दिले आहे. देवदत्तने अलिबागमधील रस्त्यांवर पावसामुळे पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांसमोर सेल्फी काढून तो फेसबुकवर पोस्ट केला. यावेळी त्याने सेल्फीला ‘आय लव्ह माय अलिबाग’ असे कॅप्शनही दिले. देवदत्तच्या या सेल्फीनंतर नेटिझन्सनी मात्र आमचा यंत्रणेवर विश्वास राहिला नसून, ‘देवा आता तुम्ही काहीतरी करा’ असे त्याच्याकडे साकडे घातले आहे. 

अलिबाग हे प्रेक्षणीय स्थळ असून, पावसाळ्यात याठिकाणी येणाºया पर्यटकांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे येथे येणाºया पर्यटकांना खड्ड्यांमधून वाट काढावी लागत असल्याने त्यांना चांगलीच हालअपेष्टा सहन करावी लागत आहे. कदाचित हीच बाब देवदत्तला खटकली असावी. देवदत्त हा अलिबागचा असून, अलिबागबद्दल त्याच्या मनात असलेले प्रेम त्याने वेळोवेळी दाखवून दिले आहे. म्हणूनच त्याने यावेळेसदेखील अलिबागच्या रस्त्यांचा प्रश्न मांडत आपली नाराजी व्यक्त केली. मात्र त्याच्या या नाराजीतही सौम्यपणा असल्याचे दिसून आले. कारण ‘आय लव्ह माय अलिबाग’ असे त्याने फोटोला कॅप्शन देत यंत्रणेने या शहराचे सौंदर्य अबाधित ठेवावे, असाच सूचक सल्ला दिला असावा. 

असो, देवदत्तच्या या सेल्फीनंतर मात्र नेटिझन्सनी आपल्या प्रतिक्रिया नोंदविताना आमचा यंत्रणेवरील विश्वासच उडाल्याचे म्हटले. एका यूजर्सने म्हटले की, ‘देवा आता तुम्हीच डिश्श्श करा आणि रस्ते चकाचक करा, रस्त्याचं हे चालायचच... अहो चांगले आणि छान रस्ते पहायला आपल्याला कधी हे देवच जाणो’ आणखी एका यूजर्सने म्हटले की, ‘देवा तुमच्याकडून काही होत असेल तर बघा, आमच्या नेत्यांना हे जमण्यापलीकडचं आहे.’ तर एका यूजर्सने म्हटले की, ‘देवा तुझी तलवार आहे ना, मग कर की येळकोट येळकोट जय मल्हार’ यूजर्सच्या कमेण्टचा वर्षाव पडत असतानाच एका यूजर्सने म्हटले की, ‘रस्त्यांवरचे हे मोठे खड्डे, अलिबागकरांच्या मोठ्या मनाचे प्रतीक आहेत देवा, तेव्हा जरा समजून घ्या.’

दरम्यान, देवदत्तच्या या पोस्टनंतर आता यंत्रणेला जाग येणार काय हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. अलिबागची झालेली चाळण बघून लोकांचा संताप वाढतोय, हेच यावरून दिसून येत आहे. शिवाय काहींनी रस्त्यांच्या कामांमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचारावरही आपली भूमिका मांडल्याने प्रशासन याकडे किती गांभीर्याने बघणार? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. 

Web Title: The fort of Alibag road shown by Devadatta Nagane; Netizens said, 'now you do something!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.